Mangesh Chavan Politics: उन्मेष पाटील यांनी देशमुख गटाशी तडजोड केली, तरीही आमदार मंगेश चव्हाण हेच ठरले चाळीसगावचे किंग!

Jalgaon-BJP-Girish-Mahajan-MLA-Mangesh-Chavan-create-New-Political-History-Wife-Pratibha-Chavan-Became-Council-President-गिरीष महाजनांचा उजवा हात असलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी घडविला भाजप विरोधकांचा डाव उलटवत घडवला नवा इतिहास.
Mangesh-Chavan
Mangesh-ChavanSarkarnama
Published on
Updated on

Mangesh Chavan News: जळगावच्या नगरपालिका निवडणुकीत चाळीसगाव निकाल चर्चेत आहे. भाजप नेते गिरीष महाजन यांचा उजवा हात असलेले आमदार मंगेश चव्हाण विरूद्ध भाजपचे कट्टर विरोधक उन्मेष पाटील यांच्यात ही लढत रंगली होती. हे त्याचे मोठे कारण होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप पक्ष सोडला होता. चाळीसगावला गेल्या निवडणुकीत त्यांनीच भाजपसाठी सत्ता खेचून आणली होती. यंदा त्यांनी भाजपला आव्हान देत विरोधक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या देशमुख कुटुंबियांशी सख्य केले होते.

या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महाजन यांचे उजवे हात म्हणून चव्हाण यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे चव्हाण यांना दगाफटका झाला असता, तर त्याचे खापर विरोधकांनी थेट महाजन यांच्यावर फोडले असते.

Mangesh-Chavan
Shevgaon And Pathardi Nagar Parishad Election Result : आमदार राजळेंना शेवगावात मुंडेंकडून धक्का, तर पाथर्डीत 'अभय'!

चाळीसगावच्या राजकारणात नगरपालिका निवडणुकीच्या निकालाने रविवारी नवा अध्यास सुरू झाला. कधी नव्हे तर आमदार व शहराच्या नगराध्यक्षा ही दोन्ही महत्त्वाचा पदे एकाच कुटुंबात गेली आहेत. घराणेशाहीच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी ते घडवून आणले.

Mangesh-Chavan
Suhas Kande Politics : मनमाडचा किंग झोपवला, सुहास कांदेंनी केला नव्या 'पाटलाचा' उदय

माजी आमदार राजीव देशमुख यांचे निवडणुकीच्या तोंडावरच निधन झाले होते. त्याची सहानुभूती जनतेत होती. त्यामुळे आमदार चव्हाण यांनी विरोधकांपुढे मैत्रीचा हात पुढे केला होता. मात्र विरोधकांनी ते नाकारल्याने निवडणूक बिनविरोध झाली नाही.

दोन्ही बाजुंना या संधीचा फायदा करून घेता आला नाही. त्यामुळे ही निवडणूक झाली. या निमित्ताने चाळीसगावकरांनी देशमुख परिवाराला नाकारले आहे. सहानुभूती ऐवजी विकासाला महत्त्व दिल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.

माजी खासदार उन्मेश पाटील यांचे देखील आता तालुक्याच्या राजकारणातून अस्तित्व काय? हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी खासदार पाटील यांना त्यांच्या विश्वासातला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. आमदार चव्हाण हे चाळीसगावचे नवे सत्ताकेंद्र निर्माण झाले.

चाळीसगावच्या निवडणुकीत पाचोरा येथील आमदार किशोर पाटील आणि पारोळ्याचे माजी आमदार सतीश पाटील यांनीही मंगेश चव्हाण यांच्या विरोधात प्रचार केला. त्यांच्या आवाहनाला मतदारांनी साथ दिली नाही. आमदार चव्हाण यांच्यामागे शहरवासीय उभे राहिल्याचे दिसले.

सौ. प्रतिभाताई चव्हाण यांनी देखील गेल्या सहा वर्षांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता त्या नगराध्यक्ष तर पती आमदार आहेत. त्यामुळे सत्ताधारी म्हणून पुढील काळ अधिक आव्हानात्मक असेल.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com