Saroj Ahire Politics: एकनाथ शिंदेंचा वारू दोन महिलांनी रोखला; ‘बाप’ काढणारे करंजकर टप्प्यात येताच, अहिरेंकडून हिशोब चुकता!

Saroj Ahire Politics Eknath Shinde Setback: अजित दादांच्या दोन महिलांनी संपवली एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराची तीस वर्षांची सत्ता, भगूरचे परिवर्तन चर्चेत!
Saroj Ahire & Prerna Balkawde
Saroj Ahire & Prerna BalkawdeSarkarnama
Published on
Updated on

Saroj Ahire Latest Political News: जिल्ह्याच्या नगरपालिका निवडणुकीत भगूर चा निकाल धक्कादायक ठरला. या निवडणुकीत दोन महिलांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा सत्तेचा वारू रोखला. शिंदेंच्या शिलेदाराचे राजकारणच संपले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे कोणत्याही स्थितीत भाजपला सत्ता हवी होती. त्यांचे हे स्वप्न विजय करंजकर यांच्या अति आत्मविश्वासाने पूर्ण केले. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा जिल्हाभर उधळलेला सत्तेचा वारू येथे अडला.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विजय करंजकर गेली तीस वर्ष भगूर नगरपालिकेत सत्तेत होते. यंदाही आपणच सत्तेत राहू या आत्मविश्वासाने ते निवडणुकीत उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनी करंजकर यांचे ते स्वप्न उद्ध्वस्त केले.

Saroj Ahire & Prerna Balkawde
Suhas Kande Politics : मनमाडचा किंग झोपवला, सुहास कांदेंनी केला नव्या 'पाटलाचा' उदय

या निवडणुकीत विजय करंजकर यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्षा अनिता करंजकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आक्रमक आणि राजकीय बाळकडू घेतलेल्या प्रेरणा बलकवडे यांनी त्यांचा पराभव केला. यानिमित्ताने करंजकर कुटुंबीयांची तीस वर्षांची सत्ता संपुष्टात आली.

Saroj Ahire & Prerna Balkawde
Mangesh Chavan Politics: उन्मेष पाटील यांनी देशमुख गटाशी तडजोड केली, तरीही आमदार मंगेश चव्हाण हेच ठरले चाळीसगावचे किंग!

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे करंजकर यांच्यासमोर उमेदवार उभे राहतील का अशी सुरुवातीची स्थिती होती. या प्रतिकूल परिस्थितीत आमदार अहिरे आणि प्रेरणा बलकवडे यांनी विरोधकांची मोट बांधली. त्यांचे हे परिश्रम यशस्वी झाले.

विजय करंजकर यांचा आत्मविश्वास फाजील होता हे मतदारांनी सिद्ध केले. इच्छुकांची प्रचंड गर्दी असताना अनुभवी नेत्यांना करंजकर यांनी घरी बसवले. सामान्य आणि संपर्क नसलेल्यांना उमेदवारी दिली. त्यांचे हे धोरण अंगलट आले.

श्री करंजकर यांनी सुरुवातीपासून राजकारणातील 'अर्था'वर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच आमदार अहिरे आणि करंजकर यांच्यात जुंपली. हा वाद एवढा टोकाला गेला की करंजकर यांनी आमदार अहिरे यांचा 'बाप' काढला. त्यानंतर आमदार अहिरे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले. पंधरा दिवस रोज घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार केला. करंजकर यांच्या विरोधात सहानुभूती मिळविण्यात त्या यशस्वी झाल्या.

श्री करंजकर भगूरचे नगराध्यक्ष म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला देखील नडले होते. लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला होता. ठाकरे यांनी सर्व काही देऊ नाही करंजकर यांनी पक्षाला दगा दिला. लोकसभा निवडणुकीनंतर नगरपालिका निवडणुकीतही त्यांचे पक्षांतर अनेकांना आवडले नाही, असे मतदानातून स्पष्ट झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिरे यांच्या पॅनल साठी तर एकनाथ शिंदे यांनी करंजकर यांच्यासाठी सभा घेतली. त्यामुळे निवडणुकीत चुरस होती. त्यात अनिता करंजकर यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रेरणा बलकवडे मोठ्या मताधिक्यांने विजयी झाल्या.

बलकवडे कुटुंब प्रदीर्घकाळ सत्तेपासून दूर होते. यानिमित्ताने ते पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आले आहे. आमदार अहिरे आणि श्रीमती बलकवडे या दोन महिलांनी विजय करंजकर यांची तीस वर्षांची सत्ता संपवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com