Nashik BJP MLA : 'खड्डे' अन् 'डेंग्यू' समस्येवरून भाजप आमदार आक्रमक; महापालिका आयुक्तांना दिला 'हा' इशारा!

Nashik BJP MLA to Municipal Commissioner : '...मात्र महापालिकेने दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यामध्ये प्रचंड विरोधाभास असल्याची जाणीव या आमदारांनी करून दिली.'
Nashik BJP MLA to Municipal Commissioner
Nashik BJP MLA to Municipal CommissionerSarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP News: शहरातील स्मार्ट रस्त्यांपासून तर महामार्गापर्यंत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अपघात वाढले आहेत. या संदर्भात विविध संघटनांनी महापालिका आणि संबंधित विभागांना वारंवार इशारा दिला होता. याबाबत विविध राजकीय पक्षांनी आंदोलन देखील केले. आता भारतीय जनता पक्षाचे शहरातील तिन्ही आमदार नागरिकांच्या या समस्यांवरून आक्रमक झाले आहेत.

या संदर्भात भाजपचे आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे(Devyani Farande), पक्षाच्या कार्यकर्त्या रश्मी बेंडाळे यांनी महापालिका आयुक्तांची चर्चा केली. महापालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले होते.

यावेळी नागरिकांकडून वारंवार इशारा दिल्यानंतरही प्रशासन शहरातील रस्त्यांवरील खड्डे, पिण्याचा पाण्याचा तुटवडा आणि डेंग्यूची साथ या प्रश्नावर थातूरमातूर उपाययोजना करीत आहे.याबाबत महापालिका गांभीर्याने काम का करीत नाही?, असा प्रश्न आमदार राहुल ढिकले यांनी प्रशासनाला विचारला.

Nashik BJP MLA to Municipal Commissioner
Uday Samant on Rajan Salvi : '..अशा व्यक्तीने मला सल्ले द्यायची आवश्यकता नाही'; उदय सामंतांचा राजन साळवींवर पलटवार!

नागरिकांच्या दृष्टीने हा गंभीर विषय असल्याने आमदारांनी अतिशय कठोर शब्दात प्रशासनाला सुनावले. महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिकेने दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यामध्ये प्रचंड विरोधाभास असल्याची जाणीव या आमदारांनी करून दिली.

नागरिक याबाबत सातत्याने शहरातील लोकप्रतिनिधींकडे तक्रार करीत आहेत. अनेक संघटनांनी आमदारांकडे देखील याबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे शहरातील या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. यावर काय उपाययोजना करणार? असा थेट प्रश्न महापालिका प्रशासनाला करण्यात आला. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांची ही तारांबळ उडाली. या अधिकाऱ्यांनी केलेले सर्व उपाय अपयशी ठरले आहेत.

यावेळी येत्या आठ दिवसांत या प्रश्नांबाबत ठोस उपाय योजना आणि तक्रारींचे निवारण झाले पाहिजे. तसे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येईल. प्रशासनाला सळो‌ की पळो करून सोडण्यात येईल. विशेषतः महापालिका आयुक्तांना आयुक्तांच्या खुर्चीवर बसण्यापासून रोखण्यात येईल. कोणत्याही स्थितीत आठ दिवसानंतर महापालिका आयुक्तांना कार्यालयातील त्यांच्या खुर्चीवर बसण्यापासून रोखण्यात येईल, असा इशारा तिन्ही आमदारातर्फे यावेळी देण्यात आला. या प्रकारचे आगळेवेगळे आंदोलन चर्चेचा विषय होण्याची शक्यता आहे.

Nashik BJP MLA to Municipal Commissioner
Raju Shetty : राजू शेट्टींना फडणवीस मदत करतील का?

या विषयावर आक्रमक झालेल्या आमदारांनी हे अनोखे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्तांना आपल्या खुर्चीवर बसण्यापासून रोखण्याचा प्रकार क्वचितच घडलेला असावा. आज नाशिक शहरातील भारतीय जनता पक्षाच्या(BJP) तिन्ही आमदारांनी या विषयावर प्रशासनाला धारेवर धरले.

त्यामुळे महापालिका प्रशासनही बचावात्मक स्थितीत आले आहे. आता महापालिकेच्या यंत्रणा किती सक्रिय होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com