Uday Samant on Rajan Salvi : '..अशा व्यक्तीने मला सल्ले द्यायची आवश्यकता नाही'; उदय सामंतांचा राजन साळवींवर पलटवार!

Uday Samant Press Conference: 'मला निष्ठा शिकवत असताना कुठंतरी शांतपणाने जावून, आत्मक्लेश करून2004 पासून ते आतापर्यंत...' असं उदय सामंत यांनी राजन साळवींना उद्देशून म्हटलं आहे.
Uday Samant on Rajan Salvi
Uday Samant on Rajan SalviSarkarnama
Published on
Updated on

Uday Samant Politics News : 'उदय सामंत कुणाचेच होवू शकत नाहीत. ना शरद पवारांचे होवू शकले, ना उद्धव ठाकरेंचे होवू शकले आणि ना ते एकनाथ शिंदे यांचे होवू शकणार आहेत. असं म्हणत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी मंत्री उदय सामंतांवर टीका केली. ज्यावर आता उदय सामंत यांनीही पलटवार केला आहे.

राजन साळवींच्या टीकेवर पत्रकारपरिषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले, 'राजन साळवींवर बोलून राजन साळवींना मला त्यांना नेता बनवायचं नाही. राजन साळवींना माझ्या निवडणुकीपासून मी 2004पासून ओळखतो. मला राजकीय काही नियम पाळायची सवय आहे. आता निष्ठेचा जर विषय आला, तर मीच 2004ला निवडणूक लढवली पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून. मग आता काही उत्तर त्यांनापण द्यावी लागतील, जे मी कधी बोलत नाही.

त्यामुळे राजन साळवी साहेबांचं जे मत आहे ते काही मी मनावर घेत नाही. मनावर घ्यावं असं देखील मला वाटत नाही आणि माझ्या सारख्याने राजन साळवींच्या(Rajan Salvi) मतावर माझं मत व्यक्त करून त्यांना मोठं करण्याची काही आवश्यकता नाही.'

Uday Samant on Rajan Salvi
Eknath Shinde : राष्ट्रवादी, शिवसेना व्हाया भाजपकडे वाटचाल! शिंदेंचा मोठा नेता 'कमळा'वर निवडणूक लढविणार?

तसेच 'मला निष्ठा शिकवत असताना कुठंतरी शांतपणाने जावून आत्मक्लेश करून 2004पासून ते आतापर्यंत ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा उदय सामंतची जी विधानसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये काय काय नक्की झालं हे कधीती आत्मक्लेश करायची वेळ येईल.' असंही उदय सामंत(Uday Samant) यांनी म्हटलं.

याशिवाय 'राजन साळवी हे विधीमंडळातील माझे सहकारी आहेत, जरी ते उबाठा पक्षाचे आमदार जरी असले. पूर्वीच्या खासदारांचं रिफायनरीबद्दलचं मत आणि यांचं मत वेगळं असलं, आता तोपण अभ्यास आपण करा. माझ्यावर टीका करत असताना विनायक राऊत(Vinayk Raut) जेव्हा इथले खासदार होते, तेव्हा ते म्हणायचे मला रिफायनरी नको आणि साळवी म्हणायेच मला रिफायनरी पाहिजे. नंतर मग हे पंधरा दिवसांनी म्हणाले मला रिफायनरी नकोय. मग जी व्यक्ती पंधरा दिवसात एका विषयावर ठाम राहू शकत नाही, त्यांनी मला सल्ले द्यायची आवश्यकता नाही.' असा पलटवार केला.

Uday Samant on Rajan Salvi
Eknath Khadse : खडसेंची तिरकी चाल, गिरीश महाजनांना चेकमेट करणार का?

याचबरोबर 'रत्नागिरी मतदारसंघावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच माझ्या कार्य अहवालाच्या प्रकाशनासाठी ज्यांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, असे देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आले होते. विकास आमटे आणि नाना पाटेकर आले होते. त्यांच्याकडून मला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर, यांच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही. पण 2004पासून ते आतापर्यंतच्या प्रत्येक खासदारकीच्या निवडणुकीला काय झालं, हे त्यांनाच विचारा. मला विचारण्याची आवश्यकता नाही.

तसेच 2004ला माझ्या निवडणुकीच्यावेळी कोण निष्ठावान होतं आणि कोण निष्ठावान नव्हतं, हा प्रश्न त्यांना विचारा. तरी देखील ते असं जरी म्हणाले असले, आक्षेपार्ह जरी बोलले असले तरी मला अजिबात राग नाही. त्यांच्यावर बोलून त्यांना अजितबात मला मोठं करायचं नाही.' असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी राजन साळवींच्या टीकेवर भूमिका स्पष्ट केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com