BJP Politics: भाजप करणार निष्ठावंतांवरील अन्यायाचे परिमार्जन?, निवडणुकीत हाकालपट्टी केलेल्यांना घालणार प्रवेशासाठी पायघड्या?

Nashik BJP Municipal Election Girish Mahajan Rebels Will Return Home With A Bang-महापालिका निवडणुकीत अन्य पक्षांतील आयारामांना संधी दिल्याने मोठ्या प्रमाणावर निष्ठावंत पक्षाबाहेर गेले
Devendra-Fadanvis
Devendra-FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP News: भाजपने हंड्रेड प्लस हा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी महापालिका निवडणुकीत तडजोडी केल्या. त्यामुळे अनेक निष्ठावंतांवर अन्याय झाला. अनेक भाजप नेत्यांनी बंडखोरी केली. आता या बंडखोरांची अर्थात निष्ठावंतांचे महत्त्व पक्षाल जाणवू लागले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर जो येईल त्याचे स्वागत, हे भाजपचे राजकीय धोरण आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकीत त्याची अंमलबजावणी तंतोतंत केली. त्यामुळे अन्य पक्षांतील अनेकांना उमेदवारीची लॉटरी लागली होती.

भाजपने महापालिका निवडणुकीत अन्य पक्षातून आलेल्या नगरसेवकांना प्राधान्य दिले होते. तर पक्षातील प्रबळ उमेदवारांना भाजप पक्षात घेण्यासाठी सत्ता आणि सरकारी यंत्रणेचाही वापर झाला होता. हे करताना निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुरावले होते. 

Devendra-Fadanvis
Leopard Attacks : बिबट्यांची दहशत वाढली, नाशिकच्या घटनेवर विधानसभेत वन विभागावर राष्ट्रवादीचा आमदार तुटून पडला; 'सरकारच्या हातात...'

उमेदवारी न मिळाल्याने भाजपमधील अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे नाशिक शहरात जवळपास शंभरहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली. निवडणूक झाल्यावर मात्र भाजप पुन्हा या निष्ठावंतांकडे डोळे लावून पहात आहे.

Devendra-Fadanvis
Shivsena Eknath Shinde: घरपट्टी माफ; शिंदे गटाच्या नगराध्यक्षांची धमाकेदार घोषणा, नागरिकांमध्ये आनंदाची लाट

महापालिका निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने अन्याय झाला होता. या अन्यायाचे परिमार्जन करण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले आहे. प्रतिस्पर्धी पक्ष प्रबळ होऊ नये म्हणून दूर गेलेल्या भाजपच्या निष्ठावंतांना पुन्हा एकदा पक्षात वाजत गाजत प्रवेश दिला जाणार आहे. 

नाशिक शहरात उमेदवारी देताना आणि उमेदवारी जाहीर केल्यावर एबी फॉर्म देताना मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला होता. त्यातून अनेकांनी बंडखोरी केली. त्याच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेत एबी फॉर्म देताना गोंधळ झाल्याचे विधान केले होते. 

या पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी पुन्हा एकदा पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत. महापालिका निवडणुकीत पक्षाने मोठे यश मिळवले. संघटनात्मक पातळीवर पक्ष प्रभावी करण्यासाठी दूर गेलेल्या बंडखोरांना पुन्हा एकदा परत फिरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला आहे. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com