Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

महापालिका निवडणुकीसाठी भाजपला हवाय बूस्टर डोस!

नाशिकमध्ये शिवसेनेचा गढ शाबूत असल्याने भाजपपुढे आव्हान.
Published on

नाशिक : ओबीसी (OBC) आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) शिक्कामोर्तब केल्यानंतर आगामी महापालिका (NMC) निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. तरीही प्रमुख पक्ष या नात्याने भाजप (BJP) मध्ये अजून फारशा हालचाली नाहीत. शिवसेनेच्या ढासळणाऱ्या गढीकडेच नेत्यांचे डोळे लागले होते. त्यामुळे आता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जोष यावा यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचे बोलले जाते. (Since Shivsena is intact, BJP leaders upset)

Girish Mahajan
मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात शिवसेनेचे विघ्न?

महापालिकेच्या २०१७ मध्ये इतिहासात प्रथमच बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपमध्ये सुरवातीचे काही दिवस बरे गेले. परंतु त्यानंतर मात्र बेबनाव दिसला. महापालिकेच्या सत्तेवर वर्चस्व मिळविण्यासाठी आमदारांमध्ये स्पर्धा झाली. गिरीश महाजन पालकमंत्री असल्याने त्यांनी सर्व सूत्रे त्या वेळी आमदार असलेल्या बाळासाहेब सानप यांच्याकडे सोपविले. नंतर गटबाजी वाढत गेली. सत्तेच्या सेकंड टर्ममध्ये आमदारांच्या गटबाजीचा प्रभाव दिसला नाही.

Girish Mahajan
पराभवाचे चटके दिलेल्या जनतेनेच मला डोक्यावर घेतले!

नव्याने निवडून आलेल्या आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले नाही. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मतदारसंघापुरते महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले. आमदार सीमा हिरे यांचा सिडको संदर्भातील प्रश्नांना हात लावण्यापुरता संबंध राहिला. त्यानंतर पक्षांतर्गत कुरघोडी सत्तेतील पदावरून झाली. नेत्यांच्या दौऱ्याचा खर्च करण्यापासून ते सत्तेतील वाट्यापर्यंत वाद विकोपाला गेले. शेवटच्या अडीच वर्षांत विरोधी पक्ष अधिक बळकट वाटला. भाजप सत्ताकाळात कामे झाले नाहीत असे नाहीत, परंतु देशपातळीवर ज्याप्रमाणे मार्केटिंगचे तत्त्व अंगीकारले जाते, तो अर्क खालच्या पातळीपर्यंत उतरला नाही. भाजपमधील कच्च्या दुव्यांचा फायदा घेत शिवसेना कायम झळकत राहिली. त्यामुळे आत्मविश्वास इतका दुरावला, की शिवसेनेने १०० प्लसचा नारा दिला.

संघटना खिळखिळी

शिवसेनेला अच्छे दिन येत असल्याने भाजपमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता पसरली. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात गिरीश महाजन यांनी नाशिक दौरा करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही मात्र भाजपची पीछेहाट होत राहिली. पुढील निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या वाढूनदेखील भाजप ५० च्या पुढे जाणार नाही, असा दावा केला गेला. मात्र एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह फुटल्याने संघटना खिळखिळी झाली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराला तोंड द्यावे लागणार नाही.

सुंठी वाचून खोकला गेला

सुंठी वाचून खोकला गेल्याने भाजपच्या गोटात काही प्रमाणात समाधानाचे वातावरण आहे. महापालिका निवडणुकीमध्ये काही करावे लागणार नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वीच अधिक खचला आहे. उरलेसुरले शिवसेनेची गढी ढासळत असल्याने भाजपमध्ये सध्या निवांत आहे. विरोधी पक्षच दुबळा होत असताना, फारसे काही करावे लागणार नाही, अशी मानसिकता सध्या भाजपमध्ये आहे.

---

आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा विकासाच्या मुद्द्यावर बहुमताने निवडून येईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच नाशिकमध्ये येऊ.

-गिरीश महाजन, भाजप नेते

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com