मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात शिवसेनेचे विघ्न?

शिवसेना नेते कोकणे यांच्या हल्लेखोरांना अटक करण्यासाठी पदाधिकारी काढणार मोर्चा.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरला शाई फासल्यानेच शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते बाळासाहेब कोकणे (Balasaheb kokane) यांच्यावर हल्ला झाला आहे. मात्र, आठ दिवस होऊनही पोलिसांकडून (Police) झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या दिवशीच पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. (Shivsena deemands action against accused of kokane`s attack case)

Eknath Shinde
पराभवाचे चटके दिलेल्या जनतेनेच मला डोक्यावर घेतले!

यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या पहिल्याच दौऱ्यात विघ्न येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

चाळीस आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र सवतासुभा निर्माण करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला नाशिकमधून कडाडून विरोध झाला. शिंदे यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये एक-दोन ठिकाणी बॅनरबाजी झाली. त्या बॅनरबाजीला विरोध म्हणून शिवसेनेचे मध्य विधानसभेचे अध्यक्ष बाळासाहेब कोकणे यांनी शाई फासली होती.

Eknath Shinde
'आमची एक चाल चुकली आणि...' : फडणवीसांनी सांगितले २०१९ च्या पराभवाचे कारण

त्यानंतर कोकणे यांच्यावर रात्रीच्या वेळी हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शाई फेकल्यानेच शिंदे समर्थकांनी कोकणे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांना हल्लेखोर माहीत आहे. तर, शिवसेनेकडूनही माहिती देण्यात आली. माहिती देऊन आठ दिवस झाले तरी अद्यापही पोलिसांकडून संबंधितांना अटक झाली नाही. पोलिस राज्यातील सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. पोलिसांनी तत्काळ अटक न केल्यास ३० जुलैला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस आयुक्तालयासमोर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

हल्लेखोर माहीत असूनही पोलिसांकडून अटक केली जात नाही. यासंदर्भात पोलिसांना माहितीदेखील देण्यात आली आहे, मात्र तरी सरकारच्या दबावाखाली कारवाई होत नाही. त्याविरोधात ३० जुलैला शिवसैनिक मोर्चा काढणार आहेत.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना, नाशिक.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com