पराभवाचे चटके दिलेल्या जनतेनेच मला डोक्यावर घेतले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त सहकारी आमदारांनी केले कामाचे कौतुक.
MLA Deelip Bankar Greetings by leadres.
MLA Deelip Bankar Greetings by leadres.Sarkarnama
Published on
Updated on

पिंपळगाव बसवंत : आमदार दिलीप बनकर (Deelip Bankar) हे विकासाची दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघात (Niphad) विकासाची गंगा अवतरली आहे. ते आता विरोधी पक्षात असले तरी ते आपल्या कौशल्याच्या बळावर निफाडची सुरू असलेली प्रगती थांबू देणार नाही, असे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी म्हटले. (Supporters wish MLA Deelip Bankar On his birthday ocasion)

MLA Deelip Bankar Greetings by leadres.
‘या’ कारणामुळे दोन आमदारांमधील वाद भडकला, पोलिसात तक्रार...

निफाडचे आमदार बनकर यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार शिरीष कोतवाल, मविप्रचे माजी संचालक विश्‍वासराव मोरे, सोहनलाल भंडारी, माजी जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे, तहसीलदार शरद घोरपडे आदी उपस्थित होते.

MLA Deelip Bankar Greetings by leadres.
संपर्क प्रमुख कोरगावकरांवर शिवसैनिकांची पुन्हा नाराजी जाहीर : आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार

आमदार कोकाटे म्हणाले, आमदार बनकर यांनी जनआशिर्वादातून राजकीय पटलावर आपला ठसा उमटविला आहे. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी जनसेवा करीत मतदारसंघाचा विकास करीत आपली निवड सार्थ ठरविली. राज्यात सत्तांतर झाले असले, तरीही आमदार बनकर यांचे मंत्रालयातील वजन पाहता निफाड मतदारसंघातील ड्रिम प्रोजेक्ट साकारतील.

यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे म्हणाले, राष्ट्रवादीचे निष्ठावान आमदार अशी आमदार बनकर यांची राज्यभरात ओळख आहे. शरद पवार व अजित पवार यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबध असलेल्या आमदारांमध्ये बनकर यांचे नाव आहे. पद मिळूनही जमिनीवर राहून जनतेशी घट्ट नाते ठेवणारे आमदार बनकर यांचे राजकीय भविष्य अधिक उज्ज्वल आहे.

आदर्श मतदारसंघ करणार

यावेळी आमदार बनकर यांनी निफाड मतदारसंघातील जनतेने दिलेल्या प्रेमातून कधी उतराई होता येणार नाही. दुसऱ्यांदा विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. माझ्या डोळ्यापुढे विकासाचे काही ड्रिम प्रोजेक्ट आहेत. ते प्रत्यक्ष साकारून जनतेचा विश्‍वास सार्थ ठरविल.

यापुढील आयुष्य मी निफाड मतदारसंघाचा विकास, जनसामान्याच्या समस्या सोडविण्यासाठी वाहून घेणार आहे. मला पराभवाचे चटके देणाऱ्या निफाडच्या जनतेने त्यानंतर डोक्यावर देखील घेतले. आमदार झालो असलो तरी बडेजाव करणार नाही. शेवटच्या घटकांचे दुःख मला पदाच्या माध्यमातून दूर करायचे आहे. रानवड साखर कारखाना कार्यान्वित करण्याचे कर्तव्य निभावले. निफाडचा ड्रायपोर्ट, नांदुरमध्येश्‍वर धरणाला वाढीव गेट यासह मतदारसंघातील दर्जेदार रस्त्याचे जाळे, आरोग्य, वीज, पाणी या सुविधा निर्माण करून निफाड हा राज्यातील आदर्श मतदारसंघ निर्मितीसाठी परिश्रम घेत आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com