
Nashik News, 08 Dec : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिर्डीहुन नाशिकला जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसवरील (Electric bus) चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर दोनजण गंभीर जखमी आहेत.
ही दुर्देवी घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मेळा बसस्थानकात घडली आहे. मेळा बसस्थानकात आलेली ई बस (MH 04, LQ 9462) ही फलाटावर चौकशी कक्षासमोर थांबली होती. यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक चौकशी कक्षासमोर उभ्या असलेल्या तिघांना धडकली.
या धडकेत आंध्रप्रदेशमधील एक महिला भाविक जागीच ठार झाली तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर (Accident) बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी ते नाशिक या मार्गांवर धावणारी ई बस मेळा बस स्थानकात आली.
यावेळी लॉकसीट एंट्री करण्यासाठी बस चालक खाली उतरला आणि पुन्हा बसमध्ये चढला आणि त्याने बस सुरू करताच बस थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर जाऊन आदळली. तर याचवेळी कक्षाजवळ उभ्या असलेल्या तिघांना बसची जोरदार धडक बसली यात एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.