Mahesh Sawant : बाळासाहेबांनी शेंदूर फासलेल्या दगडाचा माज उतरवला..., ठाकरेंच्या आमदाराची शिंदेंच्या नेत्यावर बोचरी टीका

Mahim Assembly Constituency News : "आम्ही माहीमवर भगवा फडकवण्याची वाट पाहात होतो. या मतदारसंघावर जो गद्दारीचा शाप लागला होता. तो शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मिळून पुसून टाकला. असं म्हणतच त्यांनी राज ठाकरेंचं आव्हान आम्ही विचारात घेतलं नव्हतं,"
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 08 Dec : ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena) माहीम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी शिंदे गटाचे नेते आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सदा सरवणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मी सदा सरवणकरांचा माज उतरवला आणि मागचा हिशोब चुकता केला अशा शब्दात त्यांनी सरवणकरांवर टीका केली आहे. आमदार महेश सावंत माध्यमांशी बोलताना म्हणाले, "बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) ज्या दगडाला शेंदूर फासला त्या सदा सरवणकर यांचा मला माज उतरवायचा होता आणि तो उतरवला.

त्यामुळे आता मागचा हिशोब चुकता झाला आहे. मी सरवणकरांच्या मुलाविरुद्ध देखील अपक्ष लढलो होतो. त्यावेळी केवळ पावणे दोनशे मतांनी माझा पराभव झाला होता. त्यावेळीचा हिशेब शिल्लक होता. तो आता चुकता झाला आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Eknath Khadse Vs Fadnavis: मोठी बातमी! पुन्हा CM झालेल्या फडणवीसांसोबतचं राजकीय शत्रुत्व मिटवण्याबाबत खडसेंचं मोठं विधान

शिवाय मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, सरवणकर (Sada Saravankar) माझे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असतानाही मी लढलो. दोन वर्षांपूर्वी त्यांनी माझ्यावर फायरिंग केली होती. पण आम्ही बाळासाहेबांना वचन दिलं होतं की, कोणत्याही परिस्थितीत आम्ही माहीम मतदारसंघावर भगवा फडकवणार."

दरम्यान, माहीम मतदारसंघावर जो गद्दारीचा शाप लागला होता, तो आम्ही पुसून टाकल्याचंही ते सावंत (Mahesh Sawant) म्हणाले. आम्ही माहीमवर भगवा फडकवण्याची वाट पाहात होतो. या मतदारसंघावर जो गद्दारीचा शाप लागला होता. तो शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मिळून पुसून टाकला.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Sharad Pawar : EVM बाबत पुरावे नाहीत पण..., मारकडवाडीला का जाणार? शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं

असं म्हणतच त्यांनी राज ठाकरेंचं (Raj Thackeray) आव्हान आम्ही विचारात घेतलं नव्हतं, असा टोला मनसेला लगवाला. कारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहिममध्ये तिरंगी लढत झाली. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर ठाकरे गटाचे महेश सावंत आणि मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यात प्रमुख लढत झाली. या निवडणुकीतून महेश सावंत 1300 मतांनी निवडून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com