
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. सोग्रस फाटा येथे मद्यधुंद वाहनचालकाने रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना उडवलं. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 13 विद्यार्थी जखमी झाले आहेत. चांदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी पायी घरी निघाले होते. यावेळी सोग्रस फाट्यावर भरधाव छोट्या टेम्पो रस्त्याकडेच्या विद्यार्थ्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पो जागेवरच उलटला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचं म्हणणे आहे. या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला तर 13 विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती आहे.
दादा भुसे धावले मदतीला :
या अपघातानंतरच काही वेळात मंत्री दादा भुसे यांचा ताफा मालेगावकडे निघाला होता. रस्त्यावरची गर्दी आणि अपघात पाहून भुसे यांनी ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला धाव घेतली. त्यानंतर चांदवड ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्यांनी या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. नागरिकांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको :
मागील काही दिवसांत सोग्रस फाट्यावर अपघाताच्या वारंवार घटना घडत आहेत. गेल्या महिन्याभरातीलच चौथा ते पाचवा अपघात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अखेर संतप्त जमावाचा उद्रेक झाला आणि त्यांनी या ठिकाणी थेट रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
जवळपास 3 तास चाललेल्या या रस्तारोकोने मुंबईकडे जाणाऱ्या आणि मालेगावकडून येणाऱ्या वाहनांची प्रचंड कोंडी झाली. रस्त्यावर 12 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. वारंवार अपघात आणि त्याबाबतच्या तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलिसांनी काय कारवाई केली असा संतप्त प्रश्न या आंदोलकांनी केला.
मुंबई आग्रा महामार्गाशिवाय धुळ्याला जाण्यासाठी आणि नाशिकला परतण्यासाठी कोणताही पर्याय मार्ग या भागात नाही. शिवाय रुंदीकरणाचे कामही अत्यंत संथगतीने सुरु आहे. त्यामुळे शेकडो वाहने अडकून पडली. यामध्ये अनेक रुग्णवाहिका, बसेस आणि अन्य वाहने होती. या वाहतूक कुंडीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासह काही नेते देखील अडकून पडले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.