
Nashik Politics : सध्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सात आमदार आहेत. यापाठोपाठ भाजपचे पाच आमदार, शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार व एमआयएमचा एक आमदार आहे. नाशिक जिल्ह्यात आधी तीन कॅबीनेट मंत्री होते, त्यात छगन भुजबळ यांची भर पडल्याने आता जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. त्यातील तीन कॅबिनेट मंत्रीपदे एकट्या राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट) यांच्याकडे असल्याने जिल्ह्यात आता राष्ट्रवादीचा चांगलाच दबदबा वाढला आहे.
तब्बल सात आमदार व तीन कॅबिनेट मंत्रिपदे असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यात वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे (कृषी) व नरहरी झिरवाळ (अन्न व औषध) या तिघांकडे मंत्रीपदे आहेत. शिवाय वजनदार खाती आहेत. तर चौथे मंत्रिपद शिवसेनेचे दादा भुसे(शालेय शिक्षण) यांच्याकडे आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीकडून नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा करण्यात येऊ शकतो. याआधीही तो करण्यात आला होता. छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून याच मुद्द्यावर पालकमंत्री पदाचा दावा करण्यात आला. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार असल्याने राष्ट्रवादीचा पालकमंत्री व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र त्यातही भुजबळ की कोकाटे हा वाद आहे.
सत्ताधारी भाजपलाही राष्ट्रवादी जिल्ह्यात वरचढ ठरली आहे. भाजपचे जिल्ह्यात पाच आमदार आहेत. परंतु तरीही भाजपची मंत्री पदाची पाटी कोरीच आहे. एकाही आमदाराला मंत्रीपदापर्यंत पोहचता आलेलं नाही. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी सब पे भारी असे चित्र आहे. सर्वांधिक आमदार व मंत्रीपदे असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. अशात नाशिक जिल्ह्यात महायुती न झाल्यास राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिंदे गट व भाजप दोघांनाही भारी पडू शकतो. तीन कॅबिनेट मंत्री पक्षात असल्याने स्थानिक पातळीवर मतदारांना आकर्षित करण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जाणार आहे. त्यातून निश्चितच पक्षाला फायदा होईल.
देवळाली विधानसभा - सरोज अहिरे
कळवण विधानसभा - नितीन पवार
येवला विधानसभा - छगन भुजबळ
सिन्नर विधानसभा - माणिकराव कोकाटे
निफाड विधानसभा - दिलीप बनकर
दिंडोरी विधानसभा - नरहरी झिरवळ
इगतपुरी विधानसभा - हिरामण खोसकर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.