Nashik Congress News: प्रयागराज येथील महा कुंभमेळ्यात गंगेचे पाणी प्रदूषित असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदावरीचे पाणी मात्र पिण्यास योग्य आहे. असा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. त्यावरून एक नवा वाद सुरू झाला आहे.
गोदावरी प्रदूषणाबाबत सत्ताधारी महायुतीच्या आमदारांसह विरोधी पक्ष सातत्याने आंदोलन करीत आला आहे. मात्र महापालिका आणि संबंधित यंत्रणा मूग गिळून गप्प बसले आहेत. आता हा प्रश्न नाशिकला होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गंभीर बनला आहे.
या प्रश्नावर काँग्रेसने मात्र आक्रमक होत आगळे वेगळे आंदोलन केले. हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्ष अचानक सक्रिय झाल्याचे चित्र आहे. त्यांनी विविध नागरी प्रश्नांवर आंदोलन केले.
गोदावरी प्रदूषणाच्या विषयावर काँग्रेसचे शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गोदावरीच्या प्रश्नावप प्रदूषण नियंत्रण मंडळाला धारेवर धरले. गोदावरीचे पाणी पिण्यास योग्य आहे. असा अहवाल या संस्थेने दिला होता.
या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी थेट गोदावरीच्या पाण्याने भरलेल्या बाटल्या देत हे पाणी पिण्याचे आव्हान दिले. या आव्हानानंतर मात्र अधिकारी ते कसे टाळता येईल, याचे बहाने करू लागले. या अधिकाऱ्यांनी शेवटपर्यंत ते पाणी पिलेच नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभारच संशयाच्या भौऱ्यात सापडला आहे.
मंडळांने जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत गोदावरीच्या पाण्याच्या तपासणीचा अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये गोदावरीचे पाणी पिण्यास योग्य आहे. असा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या या दाव्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
शहर आणि शहर बाहेर गोदावरीच्या प्रदूषणाची स्थिती अत्यंत बिकट आहे. महापालिकेच्या हद्दीत १३०० हून अधिक मलजलवाहिन्या थेट नदीत सोडण्यात आल्या आहे. औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांचे प्रदूषित पाणी देखील थेट नदीत जात आहे. त्यामुळे गोदावरीचे प्रदूषण नियंत्रणात असल्याचा दावा करणाऱ्या संस्थेने याबाबत काय कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
यासंदर्भात मंडळाने नाशिक महानगरपालिकेवर कारवाई करण्यात यावी. पाण्याचे नमुने कोणत्या भागातून घेतले. हे देखील जाहीर करावे आणि पाणी पिण्यास योग्य असल्यास ते संबंधित यंत्रणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनतेसमोर पिऊन दाखवावे, असे आव्हान यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शहराध्यक्ष आकाश छाजेड सेवा दलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर, विजय पाटील, संदीप वाघ, गौरव खैरनार, संतोष शेवाळे, सिद्धार्थ गांगुर्डे, उमेश चव्हाण यांचा अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.