Bhaskar Bhagare Politics: भास्कर भगरेंचा थेट प्रशासनाला सवाल, शासनाला खासदार सावत्र वाटतात का?

Bhaskar Bhagre Questions Administration: खासदार भगरे यांनी सिंहस्थ कुंभमेळा विषयावर संसदेत उपस्थित केला प्रश्न.
Bhaskar Bhagare, Rajabhau Waje & Girish Mahajan
Bhaskar Bhagare, Rajabhau Waje & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News: नाशिक मध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याची प्रशासकीय तयारी सुरू आहे. यानिमित्त विविध बैठका होत आहेत. मात्र या बैठका आणि एकंदरीतच नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यात लोकप्रतिनिधींना सहभागी केले जात नाही.

सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासकीय स्तरावर मंत्री गिरीश महाजन आणि अधिकारी करीत आहेत. मात्र अद्यापही पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री कोण? आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी करणार कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर थेट लोकसभेत चर्चा घडली.

Bhaskar Bhagare, Rajabhau Waje & Girish Mahajan
MLC Election : "मी कोणाचं उष्ट खात नाही" : शिंदेंकडून उमेदवारी जाहीर होताच रघुवंशींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला. सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी नाशिकच्या दोन्ही खासदारांना विश्वासात घेतले जात नाही.

हे खासदार अनेकदा प्रशासनाशी संपर्क करतात. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याची कोणती कामे होणार आणि त्यांच्या मतदारसंघात काय सुविधा केल्या जाणार आहेत. याबाबत कोणतीही माहिती अधिकृत स्वरूपात मिळत नाही.

Bhaskar Bhagare, Rajabhau Waje & Girish Mahajan
MLC Election : गावितांच्या वर्चस्वाला शिंदेंचा धक्का; रघुवंशींना आमदारकी देऊन वाढवली शिवसेनेची ताकद

सिंहस्थ‌ कुंभमेळ्याच्या तयारीत विविध बैठकांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि अगदी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही निमंत्रित केले जात नाहीत. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. आता नाशिक आणि दिंडोरी दोन्ही मतदारसंघाच्या खासदारांनी हीच तक्रार केली आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या तयारीला राजकीय वळण लागते की काय, अशी स्थिती आहे.

याबाबत खासदार भगरे म्हणाले, प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा अनुभव पाहता पुरेशी दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रयागराज येथे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. स्नान ज्या घाटावर होते तेथील गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित झाला.

हा विषय गंभीर आहे. नाशिकला गोदावरीचे प्रदूषण हे गंभीर स्तरावर पोहोचले आहे. याबाबत शहरातील सांडपाणी आणि औद्योगिक संस्थांचे दूषित पाणी थेट नदीत सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी प्रदूषित झाली आहे. शहराबाहेर निफाड तालुक्यातील स्थिती यामुळे बिघडली आहे. गोदावरी प्रदूषणावर शासनाने विशेष लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एकंदरच सिंहस्थ कुंभमेळा हा आता चर्चेचा आणि आरोप प्रत्यारोपांचा विषय ठरू लागला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ही यापूर्वी तक्रार केली. आता महाविकास आघाडीच्या खासदारांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकारणात सिंहस्थ कुंभमेळ्याची चर्चा होणारच अशी स्थिती आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com