Nashik constituency 2024: बोरस्ते म्हणतात, हेमंत गोडसे हेच असतील उमेदवार!

Nashik Loksabha Constituency : महायुतीतील जागावाटपाच्या गोंधळावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे स्पष्टीकरण. अद्यापही घोषणा झालेली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये उमेदवाराविषयी उत्सुकता आहे.
Ajay Boraste , Hemant Godse
Ajay Boraste , Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Hemant Godse News: नाशिक मतदारसंघातील उमेदवार आणि जागावाटप याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. निवडणूक प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील Shivsena Eknath Shinde Group जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात Nashik Loksabha Constituency रस दाखविला आहे. हा मतदारसंघ मिळावा म्हणून भारतीय जनता पक्ष अधिक आक्रमक आहे. राष्ट्रवादी अजित पवार Ajit Pawar गटाकडून येथे उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे Hemant Godse हे या मतदारसंघातील प्रमुख दावेदार आहेत. अद्यापही घोषणा झालेली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये उमेदवाराविषयी उत्सुकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या समवेत नाशिकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चर्चा झाली. या वेळी जागावाटपातील अडचणींची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना विचारात घेतल्या. नाशिकचा मतदारसंघ Nashik Constituency हा शिंदे गटाकडेच राहील. याबाबत आता कोणताही वाद नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. या मतदारसंघातून गोडसे हेच उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Ajay Boraste , Hemant Godse
Lok Sabha Election 2024 : भुजबळांच्या 'त्या' विधानाने गोडसे समर्थक अस्वस्थ?

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत निवडणूक प्रक्रिया येत्या एक दोन दिवसांत सुरू होईल. या पार्श्वभूमीवर नवीन उमेदवाराला मोठी तयारी करावी लागणार आहे. खासदार गोडसे यांनी यापूर्वीच निवडणुकीची सर्व तयारी केली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी गोडसे यांना पाठिंबा व्यक्त केला. अन्य इच्छुक तसेच पदाधिकाऱ्यांनी एकमताने गोडसे यांना उमेदवारी द्यावी, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसारच खासदार गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून Nashik Loksabha Election उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यात आता कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विविध अफवांवर विश्वास न ठेवता प्रचाराला लागावे, असेही बोरस्ते म्हणाले.

राज्यातील ठाणे आणि नाशिक या दोन मतदारसंघांबाबत महायुतीमध्ये वाद आहे. ठाणे आणि नाशिक येथे यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार होते, त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde यांनी दावा केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे कार्यक्षेत्रदेखील ठाणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे ते या मतदारसंघाबाबत संवेदनशील आहेत. या पार्श्वभूमीवर रोज नव्या बातम्या बाहेर येत असतात त्या दृष्टीने बोरस्ते यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

R

Ajay Boraste , Hemant Godse
Lok Sabha Election 2024 : शिवसेनेच्या माजी आमदाराची 'ती' तुतारी भाव खाऊन गेली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com