Lok Sabha Election 2024 : शिवसेनेच्या माजी आमदाराची 'ती' तुतारी भाव खाऊन गेली!

Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारासाठी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांचा जोरदार प्रचार
Anil Kadam
Anil KadamSarkarnama

Dindori Political News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचार सध्या जोरात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे भास्करराव भगरे (Bhaskarrao Bhagare) यांच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गट जोमाने उतरला आहे. माजी आमदार अनिल कदम व त्यांचे सहकारी घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या (भाजप) केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार (Bharati Pawar) आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांच्यात थेट लढत आहे. बहुजन आघाडीने येथे मालती थविल यांना उमेदवारी दिली आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित (JPGavit) हे देखील अपक्ष उमेदवारीचे मनसुभे आखत आहेत. महायुतीला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही उमेदवारी करावी असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपशकुन करण्याची त्यांच्या हितचिंतकांची तयारी दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीच्या प्रचारात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. निफाड तालुक्यात विविध गावांमध्ये जाऊन माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांनी घरोघर प्रचार सुरू केला आहे. या प्रचारात त्यांची वेगळ्याच कारणाने मतदारांमध्ये चर्चा आहे.

मतदारांच्या गाठीभेटी घेताना ते प्रत्येकाला संवादाऐवजी खुणा करून मतदानाचे आवाहन करण्यास प्राधान्य देतात. ओझर येथील प्रचारात त्यांनी बाजारपेठेत ठिकठिकाणी मतदारांना मतदानाचे आवाहन केले.

या वेळी त्यांनी हाताच्या इशाऱ्याने उमेदवार भास्करराव भगरे यांचे चिन्ह असलेली 'तुतारी' अतिशय उत्कृष्टपणे करून दाखवली. ठिकठिकाणी ते मतदार आणि दुकानदारांना हे आवाहन करीत होते. त्यांनी दोन्ही हातांनी केलेली 'तुतारी' आणि प्रचार दोन्हीही चर्चेचा विषय ठरले आहेत.

Anil Kadam
Lok Sabha Election 2024 : 'माकप'ची समजूत काढताना जयंत पाटलांची दमछाक, जे.पी गावित आक्रमक

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू होत आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचारात जीव ओतला आहे. येत्या 29 एप्रिलला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिंडोरी आणि नाशिकचे उमेदवार आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारात काँग्रेस वगळता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट माकप आणि शिवसेना ठाकरे गट अतिशय जोमाने उतरला आहे. काँग्रेसचे मोजके कार्यकर्ते प्रचारात दिसतात.

दिंडोरी मतदारसंघात कांदा निर्यातबंदी, द्राक्षांची निर्यात व कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कोसळलेले द्राक्षांचे भाव हे अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. शेतकरी वर्ग या प्रश्नांमुळे केंद्र शासनावर नाराज आहे. त्याची प्रचिती या प्रचारात जागोजागी येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि उमेदवार सध्या उत्साहात आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

R

Anil Kadam
Dindori Constituency 2024: शरद पवारांना धक्का, जे. पी. गावित बिघडवणार 'दिंडोरी'चे गणित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com