Nashik constituency 2024: नाशिकमध्ये ठाकरेंचे वाजे, दिंडोरीत शरद पवार गटांचे भगरे जोरात !

Rajabhau Waje vs Hemant Goodse News: नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टाने आलेल्या मतांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
Rajabhau Waje, Hemant Godse
Rajabhau Waje, Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Rajabhau Waje News : नाशिक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी सकाळी आठला सुरू झाली. यामध्ये सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी सुरू करण्यात आली आहे. पोस्टाने आलेल्या मतांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत. तर दिंडोरी मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार पिछाडीवर आहेत.

प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये पंधरा ते वीस मिनिटात पहिल्या फेरीची आकडेवारी स्पष्ट होऊ शकेल. सध्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रत्यक्ष आकडेवारीच्या मोजणीत दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे भास्कर भगरे आघाडीवर आहेत.

नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) खासदार हेमंत गोडसे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com