Nashik constituency 2024 : हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री शिंदे यांचा ग्रीन सिग्नल ?

Candidates for Nashik and Thane constituencies will be announced in the next two days : येत्या दोन दिवसांत नाशिक आणि ठाणे मतदारसंघाच्या उमेदवारांची होणार घोषणा
Eknath Shinde- Hemant Godse
Eknath Shinde- Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Hemant Godse News : गेले दोन महिने नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण याबाबत उत्सुकता होती. या संदर्भात आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला.

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, खासदार हेमंत गोडसे यांचा विविध पदाधिकारी मुंबई तळ ठोकून होते. या पदाधिकाऱ्यांची आज पहाटे मुख्यमंत्र्यांसाेबत चर्चा झाली. या वेळी उमेदवारीच्या घोषणेला विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांत अस्वस्थता असल्याचे पदाधिकाऱ्यांनी प्रकर्षाने मांडले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदार गोडसे यांच्या उमेदवारीला संमती दिली. त्यांना प्रचाराला सुरुवात करण्याची सूचनादेखील त्यांनी दिल्या. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीवर शिवसेना शिंदे गटाने आता निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde- Hemant Godse
Sadashiv Lokhande Net Worth : ना कारखाना, ना शिक्षण संस्था; तरीही सदाशिव लोखंडे आहेत करोडपती

महायुतीच्या जागावाटपात ठाणे आणि नाशिक या दोन मतदारसंघांवर महायुतीचे नेते अडकले होते. या दोन्ही जागांवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ही जागा आपल्यालाच हवी, असा आग्रह मुख्यमंत्री शिंदे यांचा होता. भारतीय जनता पक्षाला आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता ठाणे मतदारसंघ भाजपला हवा होता.

नाशिक मतदारसंघावरदेखील भारतीय जनता पक्षाने दावा केला होता. मात्र, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाने ही उमेदवारी मागितली होती. राज्याच्या नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी आणि भाजपचे सहमतीचे उमेदवार होत. या सर्व वादात नाशिक मतदारसंघाचा प्रश्न तीन आठवडे रेंगाळला. अखेर आता त्यावर निर्णय झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या संदर्भात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा होईल. त्यात अंतिम निर्णय होईल. त्यानंतर उद्या याबाबतचे अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. खासदार गोडसे यांना उमेदवारीबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबतच्या अनिश्चिततेमुळे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) इच्छुकांनी उमेदवारीसाठी गेल्या दोन दिवसांत उचल खाली होती. भुजबळ यांचे समर्थक आणि समता परिषदेनेदेखील नाशिकच्या उमेदवारीसाठीचा आग्रह कायम ठेवला होता. अखेर शिंदे गटाने नाशिक आणि ठाणे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

Eknath Shinde- Hemant Godse
Parth Pawar Y Plus security : उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना 'वाय प्लस' सिक्युरिटी !

दरम्यान, खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. उमेदवारीचा होकार मिळाल्याने आता आपण महायुतीच्या नेत्यांशी संपर्क करून चर्चा करणार आहोत. सर्वांना बरोबर घेऊन येत्या एक-दोन दिवसांत आपल्या प्रचाराला सुरुवात होईल, असे त्यांनी "सरकारनामा"च्या प्रतिनिधींना सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com