Sushma Andhare News: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेले हेलिकॉप्टर क्रॅश...

Sushma Andhare Helicopter Crashed: शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्याअंधारे या हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. त्या बसण्यापूर्वी हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Sushma Andhare News
Sushma Andhare NewsSarkarnama
Published on
Updated on

Mahad News : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या.

अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये ही घटना घडली. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Sushma Andhare News
Congress News: अखेर ठरलं; राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढणार, अमेठीतून केएल शर्मा मैदानात

आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुषमा अंधारे महाडमधून बारामतीकडे हेलिकॉप्टरने जाणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर आल्या होत्या. हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी ते कोसळले. लोकसभा निवडणुकीत अंधारे या महायुतीच्या स्टार प्रचारक आहेत. महाड येथून त्या बारामती येथे हेलिकॉप्टरमधून जाणार होत्या. बारामतीत महिला मेळाव्यात त्या मार्गदर्शन करणार होत्या.

"काल गुरुवारी महाडमध्ये प्रचार सभा होती. आज बारातीच्या दौऱ्यावर आहे. मी सकाळी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते. पावने नऊचं ते लँडिंग होते आणि 9 वाजताचं टेकऑफ होते. परंतु नऊ दहापर्यंत कुठलीही हालचाल नाही, असे लक्षात आल्यानंतर कॉर्डिनेटरला फोन केला. त्यांनी सांगितले की, दहा पंधरा मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे. नऊ वीसला आम्हाला ती हालचाल जाणवली. तीन चार चकऱ्यावर मारल्या गेल्या आणि अचानक ते गोल फिरत खाली येऊन कोसळलं," असे सुषमा अंधारे म्हणाल्या

Sushma Andhare News
Raigad News: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; शिंदे गटातील आमदार पुत्रावर गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com