Congress News: अखेर ठरलं; राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढणार, अमेठीतून केएल शर्मा मैदानात

Lok Sabha Election 2024: रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या पराभव करुन ही जागा आपल्याकडे खेचून आणली होती.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Lok Sabha Election 2024 Live Updates: उत्तर प्रदेशातील बहुचर्चित अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आज आपले उमेदवार जाहीर केले आहे. राहुल गांधी रायबरेलीमधून (Rae Bareli ) निवडणूक लढवणार असून अमेठीतून (Amethi)केएल शर्मा हे निवडणूक लढणार आहेत.

प्रियंका गांधी या अमेठीतून लोकसभा लढविणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसापासून सुरु होत्या. या जागेवर आता किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाल्याने प्रियंका या अमेठीतून लढणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आता रायबरेलीत भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांच्याशी राहुल गांधी यांचा सामना होणार आहे.

Rahul Gandhi
Loksabha Election : वंचितने कल्याणचा सुभेदार बदलला, ठाण्यातील उमेदवाराची घोषणा

भारतीय जनता पक्षाने दिनेश प्रताप सिंह यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींकडून पराभव झाला होता. भाजपने पुन्हा एकदा स्मृती इराणी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या पराभव करुन ही जागा आपल्याकडे खेचून आणली होती.

रायबरेली हा राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. राहुल गांधी हे वायनाड तसेच रायबरेलीयेथून निवडणूक लढवत आहेत. नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक जागेवरून राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी 2004 ते 2024 या काळात रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.

पाचव्या टप्प्यात या दोन्ही जागांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. या दोन्ही जागा गांधी-नेहरू घराण्याच्या सदस्यांकडे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com