Swatantryaveer Savarkar Case: राहुल गांधींच्या अडचणी मिटल्या? सावरकर मानहानी प्रकरणी नाशिक कोर्टाचा मोठा दिलासा!

Nashik court: Congress leader Rahul Gandhi offers relief in defamation case against Swatantrya Veer Savarkar-राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्यानेच घुमजाव केल्याने खटला मागे
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी वक्तव्य केले होते. त्या विरोधात देशभरातील न्यायालयांमध्ये खटले दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात खटला दाखल होता. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असे विधान काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी केले होते. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान हे विधान करण्यात आले. त्यावरून सावरकर समर्थकांनी देशात ठिकठिकाणी गांधी यांच्याविरुद्ध खटले दाखल केले होते. 

नाशिकमध्ये निर्भया फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या विरोधात खटला दाखल होता. खटल्याच्या सुनावणीसाठी दोन वेळा राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहावे लागले होते. खुद्द गांधी यांनी या प्रकारच्या खटल्यांना आपण सामोरे जाऊ असे म्हटले होते. 

Rahul Gandhi
Kumbh Mela Land Acquisition: सरकारला ट्रॅक्टर मोर्चाचे धास्ती; अधिकाऱ्याच्या त्या विधानाने आगीत तेल!

या पार्श्वभूमीवर काल नाशिकमध्ये राहुल गांधी यांना अनपेक्षित पणे दिलासा मिळाला आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खटला मागे घेत असल्याचे जाहीर केले. याचीका करते सातत्याने व्यस्त असतात. त्यांना परदेशात जावे लागते, त्यामुळे हा खटला मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi
Rahuri By Election : राहुरीवर मुंबईत मोठं राजकीय मंथन! कर्डिले-मुख्यमंत्री भेटीत विखे-जगतापांची एंट्री

हिंगोली येथे २०२२ मध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती असे विधान केले होते. त्या विधानाने व्यतीत झाल्याने याचिका दाखल करीत असल्याचे निर्भया फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले होते. या खटल्यात याचीकाकर्त्यांच्या वतीने देवेंद्र भुतडा हे एक वकील होते.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड मनोज पिंगळे यांनी याचिका मागे घेत असल्याची घोषणा केली. राहुल गांधी यांनी पुन्हा सावरकर यांच्या विषयी पुन्हा तसे वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या भूमिकेत देखील सुधारणा झालेली दिसली. त्यामुळे हा खटला मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात देशात ३७ ठिकाणी याचिका दाखल आहेत. महाराष्ट्रात भिवंडी न्यायालयात देखील याचिका आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये याचिककर्त्याने घेतलेली भूमिका राहुल गांधी यांना दिलासा देणारी ठरली आहे. आता ही याचिकाच मागे घेण्यात आल्याने सावरकर यांच्या विधानावरील वाद तत्पुरता तरी मागे पडला आहे. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com