Nashik Crime : अनधिकृत होर्डिंग्ज लावून दहशत, आरपीआयच्या भूषण लोंढे विरोधात गुन्हा दाखल

RPI Leader Bhushan Londhe : नाशिक शहरात अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर लावण्याचे प्रकार वाढले असून, काही गुन्हेगार याचा गैरफायदा घेत व्यावसायिक व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
RPI Leader Bhushan Londhe Illegal Hoardings in Nashik
RPI Leader Bhushan Londhe Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Latest News : नाशिक शहरात अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर लावण्याचे प्रकार वाढले असून, काही गुन्हेगार याचा गैरफायदा घेत व्यावसायिक व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता पोलिसांनी अशा गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

गुन्हेगारांचे होर्डिंग लावणाऱ्यांसह संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटाचे जिल्ह्यातील नेते भूषण लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोंढे यांची पार्श्वभूमी वादग्रस्त राहिली आहे.

RPI Leader Bhushan Londhe Illegal Hoardings in Nashik
Raj Thackeray : राज ठाकरेंची तोफ धडाडली, पण लक्ष्य भेदलेच नाही ! सेफ गेम खेळत, महापालिकेसाठी पर्याय ठेवला खुला ?

चार दिवसांपूर्वी सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, स्टेट बँक चौक, पाथर्डी फाटा या परिसरात सराईत गुन्हेगारांचे बॅनर आणि होर्डिंग्ज लावल्याचे आढळून आले होते. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गण्या कावळे उर्फ गणेश वाघ आणि तडीपार गुन्हेगार राकेश कोष्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांनी धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली अनधिकृत बॅनर लावले होते. ते पोलिसांनी काढून घेतले.

तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भूषण लोंढे याच्या वाढदिवसाचे होर्डिंग्स देखील सिडकोत विविध ठिकाणी आढळून आले. पाथर्डी फाटा, महामार्ग, दिव्या अॅडलॅब सिनेमा, शुभम पार्क रोड आदी ठिकाणी भूषण लोंढे याच्या वाढदिवसाचे होर्डिंग्ज पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

धार्मिक किंवा इतर कार्यक्रमांच्या होर्डिंगवर गुन्हेगारांचे फोटो असल्यास शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच स्थानिक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या हद्दीत गस्त घालत विनापरवानगी होर्डिंग असल्यास कारवाई केली जात आहे.

पोलिस रेकोर्डवरील भूषण विरोधात बॅनर लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण करुन व्यावसायिक व नागरिकांच्या मनात दहशत निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक अंबड पोलिसांनी घेतलेल्या जलद आणि कठोर निर्णयामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीररित्या होर्डिंग्ज लावून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना धडा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RPI Leader Bhushan Londhe Illegal Hoardings in Nashik
Beed Jail Gang War Update: बीड कारागृह प्रशासनाचा मोठा निर्णय; कराड,घुलेला खरंच मारहाण? गित्तेचा मुक्कामच हलवला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com