Beed Jail Gang War Update: बीड कारागृह प्रशासनाचा मोठा निर्णय; कराड,घुलेला खरंच मारहाण? गित्तेचा मुक्कामच हलवला

Baban Gite And Walmik Karad Gang Dispute : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील 6 आरोपी बीड जिल्हा कारागृहात आहेत. या आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे. पण याचदरम्यान,बीड कारागृहात सोमवारी (ता.31) सकाळी कैद्यांच्या दोन गटांमध्ये राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Walmik Karad and Baban Gite   .jpg
Walmik Karad and Baban Gite .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेंना ठेवण्यात आलेल्या बीड जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. बीड जिल्हा कारागृहात सोमवारी (ता.31) सकाळी 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास तुरुंगात महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) व सुदर्शन घुले चोपल्याची माहिती आहे. मारहाण झाली का नाही याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असतानाच कारागृह प्रशासनाची या घटनेमुळे चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे. कारण या कारागृह प्रशासनानं महादेव गित्तेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

परळीतील बापू आंधळे खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपी महादेव गित्ते आणि संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, तसेच सुदर्शन घुलेला यांच्यातील वादाचे रुपांतर मारहाणीत झाल्याचा दावा काही नेत्यांनी केला आहे. याचमुळे आता बीड जिल्हा कारागृहातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी बीड जिल्हा कारागृहात तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र,कारागृह प्रशासनानं याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.

बीड (Beed) कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्यामुळे राजकीय आरोपांनी वातावरण तापलं आहे. याचमुळे कारागृह प्रशासनानं महादेव गित्तेचा बीड कारागृहातील मुक्कामच हलवला आहे. त्याला आता छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथील कारागृहात हलवण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.

Walmik Karad and Baban Gite   .jpg
Congress Politics : रणजित कांबळेंचे ‘निरीक्षण’ ठाकरे, केदारांचे भवितव्य ठरवणार; सपकाळ लागले कामाला...

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील 6 आरोपी बीड जिल्हा कारागृहात आहेत. या आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे. पण याचदरम्यान,बीड कारागृहात सोमवारी (ता.31) सकाळी कैद्यांच्या दोन गटांमध्ये राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. यामुळे कारागृहातील आरोपींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.यातच राड्याची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे.

या तुरुंगातील घटनेसंदर्भात आमदार सुरेश धस यांनी व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महत्त्वाची माहिती दिली.दमानिया यांनी सकाळी तुरुंगात जोरजोरात भांडणं झाली असून वाल्मिक कराडला 1-2 चापट्या मारल्याचा दावाही केला आहे. दोन गटांत असलेली टोकाची भांडणं पुढे येत आहेत. त्यामुळे, बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा अभाव आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची टीकाही अंजली दमानिया यांनी केली आहे.

Walmik Karad and Baban Gite   .jpg
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील 'त्या' महिलेची हत्या? घरातून उग्र वास अन्...

तर भाजप आमदार सुरेश धस यांनी बापू आंधळे खून प्रकरणात महादेव गिते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराड याने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे सांगितले जाते. त्याचा राग या दोघांच्या मनात असल्यानं त्यांनी कराडला मारहाण केली असावी, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. वाल्मिक कराडने अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केले आहेत. त्यामुळे हा प्रकार घडल्याचंही धस यांनी बोलून दाखवलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com