Nashik Crime : कार्यालयात सापडली सापाची कात, पक्षांचे अवयव, कवडी... रविंद्र एरंडेने भोंदू खरातसारखेच कारनामे केले?

Ravindra Erande Case : अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये तथाकथित पत्रकार रविंद्र एरंडे याचे प्रकरण समोर आले आहे. त्याचेही काही महिलांसोबतचे शंभरहुन अधिक अश्लील व्हिडीओ पोलिसांना मिळालेत.
Ravindra Erande
Ravindra ErandeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Ravindra Erande Case : महिलेवर अत्याचार करुन अश्लील व्हिडीओ काढल्याप्रकरणी नाशिकच्या सातपूर येथील तथाकथित पत्रकार रविंद्र एरंडे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. १० एप्रिलपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान त्याच्या कार्यालयातून सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी असे अंधश्रद्धा पसरविणारे साहित्य आढळून आले आहे. त्यामुळे भोंदू अशोक खरातसारखेच त्यानेही कारनामे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच इतरही काही महत्वाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहे.

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचे महिला लैगिंक शोषण प्रकरण देशभरात चर्चेत आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून त्याने शेकडो महिलांचे लैगिंक शोषण केले. अनेक हायप्रोफाईल लोकांची आर्थिक फसवणूक केली. दरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत असतानाच नाशिकमध्ये रविंद्र एरंडे याचे प्रकरण समोर आले.

Ravindra Erande
Nashik Crime : नाशिकचा दुसरा खरात 'रविंद्र एरंडे'ची फाईल ओपन, अश्लील व्हिडीओ पॉर्न साईटला विकल्याचा संशय..

रविंद्र एरंडे याचेही काही महिलांसोबतचे तब्बल शंभरहुन अधिक अश्लील व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. सात महिलांचे सुमारे १२० व्हिडीओ असल्याची त्याने कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याने छुप्या रीतीने हे व्हिडीओ चित्रीत केले. त्यामुळे नाशिकमध्ये अशोक खरात पार्ट २ घडल्याची चर्चा आहे.

मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी एरंडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हातील दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी संशयित रवींद्र एरंडे याला सोमवारी न्यायालयात हजर केले होते. बचाव पक्षाने केलेला युक्तीवाद त्यावर पोलिसांनी दिलेली माहिती व केलेला युक्तीवाद पाहाता न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत एरंडेला पोलिस कोठडी सुनावली आहे. (Nashik Crime)

Ravindra Erande
Ashok Kharat Scam : समता पतसंस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; अशोक खरात याच्या खात्याप्रकरणी गुन्हा दाखल, परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश

एरंडे याने महिलांना अश्लील व्हिडीओची भीती दाखवून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आहे का? सापाची कात, पक्षांचे अवयव, कवडी त्याने कोठून आणली, त्याचा वापर कशासाठी केला जात होता याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

तसेच जप्त केलेल्या हार्डडिस्कमधील डेटाची व्याप्ती मोठी असून, सखोल तपास बाकी आहे. पीडित महिलेचे अश्लील व्हिडीओ व फोटो आणखी कोठे व कोणत्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमध्ये जतन केले आहेत. संशयित एरंडे कोणतीही माहिती देत नसून वेळकाढूपणा करत असल्याने पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मागितली. त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने संशयित आरोपीला चार दिवसांची १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com