Nashik Crime : शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या सरपंच मुलावर कोयत्याने हल्ला

Shivsena UBT News Attempted Attack on Ajinkya Chumble : किरकोळ वादातून घरासमोरच परिसरातील युवकाकडून हल्ल्याचा प्रयत्न. शहरात गेल्या काही दिवसात घडलेला हा तिसरा प्रकार आहे.
Nashik Crime News
Nashik Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News : शिवसेना ठाकरे गट युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि गौळाणे येथील सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न झाला या हल्ल्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या काही दिवसात घडलेला हा तिसरा प्रकार आहे.

शहरातील लेखा नगर येथील चुंबळे यांच्या निवासस्थानाजवळ हा प्रकार घडला. अंडा भुर्जीच्या गाडीवर भुर्जीचे पैसे मागितल्याने संतापलेल्या गुंडांनी विक्रेत्याला मारहाण केली. त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अजिंक्य चुंबळे यांनी केला. त्याचा राग आल्याने हा हल्ल्याचा प्रयत्न झाला.

यासंदर्भात अजय आठवले, सोफियान शेख, शाहरुख शेख, राजू आठवले, रोहित आठवले, रोहित मोरे यांच्या विरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादात चुंबळे किरकोळ जखमी झाल. यानिमित्ताने सराईत गुन्हेगारीचे उपद्रव सामान्य नागरिकांत चर्चेचा विषय ठरला आहे.

सरपंच अजिंक्य चुंबळे शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena) माजी नगरसेवक आणि नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे तसेच माजी नगरसेविका कल्पना चुंबळे यांचे पुत्र आहेत. गुरुवारी सायंकाळी स्थानिक युवकांशी झालेल्या वादातून हा प्रकार घडला. संबंधित युवकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Nashik Crime News
Maharashtra MLC Elections : आमदार शहाजीबापू पाटील विधान परिषद मतदानासाठी लवकच विधानभवनात जाणार

बाचाबाची झाल्यानंतर एका युवकाने टॉपरने हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी सरपंच चुंबळे हे आपल्या संपर्क कार्यालयात निघून गेले होते. त्यामुळे ते बचावले. संबंधित युवकाने आरोडा ओरड करून चुंबळे यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे सरपंच चुंबळे यांनी सांगितले.

या घटनेनंतर परिसरातील युवकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती. चुंबळे यांचे समर्थक देखील जमले होते. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी आले.

पोलिसांनी (Police) याबाबत चौकशी केली. त्यानंतर चार युवकांना ताब्यात घेतले अंबड पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Crime News
Maharashtra MLC Elections : आमदार शहाजीबापू पाटील विधान परिषद मतदानासाठी लवकच विधानभवनात जाणार

चुंबळे कुटुंबीय गौळाणे (ता. नाशिक) येथील आहेत. वाळू उपसा करणे आणि विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे देखील ते चर्चेत असतात. यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक होते.

अजिंक्य चुंबळे हे देखील युवा सेनेचे पदाधिकारी होते. मात्र त्यांनी राज्यात सत्तांतर घडल्यानंतर या पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी महापालिकेची निवडणूक लढविली होती. ते विविध पक्षांच्या नेत्यांची जवळीक ठेवून असतात.

चुंबळे कुटुंब मध्यंतरी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते. मात्र काही कारणास्तव हा प्रवेश लांबला. सध्या मात्र चुंबळे कुटुंबिय कोणत्याही राजकीय पक्षात नाही. ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी आपली जवळीक असल्याचा दावा ते करतात.

ही घटना घडल्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांत तो चर्चेचा विषय होता. शहरात गेल्या काही दिवसात नाशिक रोड तसेच अंबड पोलिस ठाण्याच्या आवारात युवकांकडून राजकीय कार्यकर्त्यांवर सशस्त्र हल्ले करण्याचे प्रकार घडले आहेत. त्याबाबत पोलिसांवर देखील टीका झाली होती. कालच्या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील गुन्हेगारी चर्चेत आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com