Vivek Kolhe: संदीप गुळवे हे तर डमी उमेदवार; विवेक कोल्हे असे का म्हणाले?

Nashik Division Teachers Constituency Vivek Kolhe Vs Sandeep Gulve: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे हे त्यांच्या प्रचारात दिसलेले नाही. ते शिंदे गटाच्या उमेदवाराचे पुतणे आहेत. शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांचे बंधू नरेंद्र दराडे हे ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आहेत.
Vivek Kolhe Vs Sandeep Gulve
Vivek Kolhe Vs Sandeep GulveSarkarnama
Published on
Updated on

Gulve Vs Kolhe News: नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तीन दिवसांवर आली आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचारावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. जोरदार आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत.

उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe)यांनी केलेल्या आरोपाने सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. कोल्हे यांनी महाविकास आघाडीचे संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांचा प्रचार आणि कार्यपद्धती याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

गुळवे हे डमी उमेदवार तर नाही ना अशी शंका कोल्हे यांनी व्यक्त केली. त्याला कारणही तसेच आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले. उमेदवारांचे अपहरण झाले. मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहेत. मात्र या सर्व प्रश्न बाबत गुळवे यांनी दुर्लक्ष केले आहे.

गुळवे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे हे त्यांच्या प्रचारात दिसलेले नाही. ते शिंदे गटाच्या उमेदवाराचे पुतणे आहेत. शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांचे बंधू नरेंद्र दराडे हे ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आहेत.

Vivek Kolhe Vs Sandeep Gulve
Pune Accident: पुतण्यानं दोघांना चिरडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार मोहिते म्हणाले, 'माझा पुतण्या पळून गेला...'

अशा स्थितीत गुळवे यांच्या प्रचारात शिवसेना पूर्णपणे उतरल्याचे दिसत नाही. त्यामुळे गुळवे हे डमी उमेदवार तर नाही ना? अशी शंका कोल्हे यांनी उपस्थित केली आहे. या चर्चेने निवडणुकीत वेगळाच विषय पुढे आला. तो सध्या चर्चेचा विषय देखील आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com