
Nashik News : नाशिकच्या द्वारका चौकातील अतिक्रमण व वाहतुक कोंडीवरुन मंत्री छगन भुजबळ यांनी काल मनपाच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाई न झाल्यास मी स्वत: रस्त्यावर उतरेन असा इशारा भुजबळांनी दिला होता. त्याचा परिणाम त्वरीत दिसून आला.
नाशिकच्या द्वारका चौकात वाढलेल्या अतिक्रमणामुळे येथे वाहतुक कोंडीची समस्या वाढली आहे. काल मंत्री छगन भुजबळ यांनी अचानक या भागातील पाहणी दौरा केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या झटकल्या. हे आमचं काम नाही असं उत्तर दिलं. त्यावरुन भुजबळांनी पोलिस व मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
मी मुंबई महापालिकेचा कारभार बघितला आहे. त्यामुळे कुणाचं काय काम आहे मला शिकवू नका या भाषेत भुजबळांनी सुनावलं. सध्याचे अधिकारी फार बीजी झाले आहेत. अधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये जायला वेळ आहे पण माझ्यासोबत कामाची पाहाणी करायला वेळ नाही असं भुजबळांनी खडसावलं होतं.
गुरूवारी महापालिकेत बैठक घेऊन मध्य नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी देखील दोन दिवसांत द्वारका परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचा अल्टीमेटम दिला होता. त्यासाठी त्या स्वत:रस्त्यावर देखील उतरल्या होत्या. नंतर मंत्री भुजबळांनी देखील त्यावर लक्ष घातलं. दोन्ही नेत्यांनी प्रशासनाला तंबी दिल्यानंतर आज (दि. १५) महापालिका व पोलिस प्रशासनाने अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं.
रविवारी महापालिका व पोलिसांनी मिळून संयुक्तरित्या या भागात अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. या भागातील काही अतिक्रमण हटवण्यात आलं. दरम्यान ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे.
दरम्यान, ही कारवाई प्रामुख्याने छोट्या दुकानांपुरतीच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या बांधकामांवर किंवा अतिक्रमणांवर कारवाई का टाळण्यात आली असा सवाल नागरिकांनी केला आहे. कारवाईदरम्यान वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मनपाचे अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे तसेच पूर्व विभागाचे अधिकारी राजाराम जाधव यांची उपस्थिती होती. या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.