HSC Board Exam 2026: बारावीच्या परीक्षा; 'कॉपी'मुळे दादा भुसे संतापले, परिक्षाकेंद्रांसह पालकांनाही धडा शिकवण्याची तयारी!

Maharashtra State Board strict rules for 12th board exams 2026: राज्यातील बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कंबर कसली.
Dada Bhuse warns exam centers over mass copying in Maharashtra
Dada Bhuse warns exam centers over mass copying in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Board Exam Rules Maharashtra: राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये कॉपीमुक्त परीक्षेसाठी सबंध यंत्रणा कामाला लागली आहे. तरीही कॉपी झालीच, तर...यावर शिक्षणमंत्री संतापले आहेत.

महाराष्ट्रात काही दिवसांपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शिक्षण विभागाने लक्ष घातले आहे. कधी नव्हे एवढा शिक्षण विभाग त्यासाठी कामाला लागला लागला असून सबंध यंत्रणा कामाला लागली आहे. 

या संदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अतिशय गांभीर्याने उपाययोजना केल्या आहेत. मंत्री स्वतः त्यासाठी परिश्रम घेत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा हा समाज आणि शिक्षण विभागासाठी एक महत्त्वाचा विषय आहे. त्याचे गांभीर्य प्रत्येकाने ओळखले पाहिजे, असे ते म्हणाले. 

Dada Bhuse warns exam centers over mass copying in Maharashtra
BJP Politics: लहान पद, मोठी मागणी! नगरसेविकेने मंत्र्यांनाही लाजवत कोट्यवधींचा बॉम्ब टाकला! चक्क ३०० कोटींची डिमांड!

कॉपीमुक्त परीक्षा हे शिक्षण विभागाचे मुख्य काम आहे. यंदा त्यासाठी गृह विभागासह महसूल आणि ग्रामविकास यंत्रणेचाही उपयोग करून घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाला या समस्येतून मुक्त करण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करीत आहोत, असे मंत्री भुसे म्हणाले. 

Dada Bhuse warns exam centers over mass copying in Maharashtra
BJP Politics: लहान पद, मोठी मागणी! नगरसेविकेने मंत्र्यांनाही लाजवत कोट्यवधींचा बॉम्ब टाकला! चक्क ३०० कोटींची डिमांड!

यंदा परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना यापूर्वीच आवाहन करण्यात आले होते. मंत्र्यांनीही याबाबत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना कॉपीचे दुष्परिणामांची जाणीव करून दिली होती. त्यामुळे शिक्षण विभागाने त्यासाठी अपार मेहनत घेतली आहे.  

या परीक्षेत कॉपी झाल्यास शाळा आणि संबंधित केंद्रप्रमुख हावर कारवाई होईलच. मात्र यंदा आम्ही अधिक गंभीर आहोत. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकावरही कारवाई करण्याचा आमचा विचार आहे. त्यादृष्टीने यंत्रणांना सुचित करण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. 

एकूणच बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या असल्या तरीही यंदा संबंध यंत्रणा आणि सरकार त्यात सहभागी झाले आहे. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षेसाठी विविध यंत्रणा आणि तांत्रिक मदत घेतली जात आहे. कॉपी पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी सगळेच मरगळ झटकून कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com