
Political food culture Maharashtra : खाद्यसंस्कृती ही राजकारणाचं एक भाग आहे, राजकारणात डिनर डिप्लोमेसी खूप महत्त्वाची असते. कार्यकर्ते किंवा राजकारण्याच्या घरी जाऊन जेवण करतो, त्यातून जे बाॅडिंग तयार होते, ते फार महत्त्वाचे असते.
त्यामुळे डिनर डिप्लोमेसीचे महत्त्व जगाच्या राजकारण आहे, हे सांगताना नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याच्या अधिवेशन काळातील मंत्री, आमदारांच्या येणाऱ्या डब्ब्यात येणाऱ्या जेवणाचं कौतुक केलं.
नाशिक (Nashik) पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सकाळ माध्यम समूहाच्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधला. यात त्यांनी देशातील काँग्रेसच्या वाटचालीवर तिखट भाष्य करताना, भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केले. आमदार तांबे यांच्या भूमिकेमुळे राज्यात त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी जग, देश, राज्य आणि भौगोलिक परिस्थितीनुसार निर्माण झालेल्या खाद्यसंस्कृतीचा आणि त्याचा राजकारणावर कसा प्रभाव यावर भाष्य केले. डिनर डिप्लोमेसीचे महत्त्व जगाच्या राजकारण असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी अधोरेखित केले.
संगमनेरमध्ये मिसळबरोबर चपाती मिळते. यामागे ग्रामीण भागातील शेती अन् व्यापार जोडला गेला आहे. पुण्यातील (Pune) बेडकरची मिसळची लज्जत सांगताना, काँग्रेस नेते गुरुदास कामत यांची आठवण आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितली. पुण्यात आणि मुंबई मिसळ म्हणजे खाणं नाही, तर ती एक भावना आहे, असे सांगताना गुरुदास कामत केंद्रात मंत्री होते. पुण्याला आल्यावर त्यांनी बेडेकर इथं जाऊन मिसळ खाल्ली नाही, असे कधीच झालेले नाही. पुण्यात आल्यानंतर ते तिथं भेटणारच, असे आमदार तांबे यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या अधिवेशन काळात विधिमंडळातील खाद्यसंस्कृतीचं आमदार सत्यजीत तांबे यांनी वैशिष्ट सांगितलं. 'कॅन्टीनच्या खाद्यावर बोलताना, तिथं फार जाण होत नाही. कामकाज गुंतललो असतो. पण अनेक आमदार, मंत्री, अधिवेशन काळात डब्बा आणतात. एकट्याचाच नाही, तर पन्नास-पन्नास किंवा शंभर-शंभर लोकांसाठी ते डब्बा आणतात', याकडे आमदार तांबे यांनी लक्ष वेधले.
भाजपचे नीतेश राणे यांच्याकडे मासेच मिळणार, जळगाव आमदार राजूमामा भोळे भरीत-भाकरी आणणार, नितीन राऊतसाहेब असताना, तरी-पोहा आणायचे, नागपूरचे सावजी-मटन, सावजी-चिकन आणायचे, ज्या-ज्या भागाचं वैशिष्ट्य आहे, त्या भागातं प्रतिबिंब जेवणात पाहायला मिळतं. अधिवेशन काळात आम्हाला कुठं जेवायचं अन् कुठं नाही, असं होतं. त्यात कधीही पक्ष वैगेर काही नसतं. सगळे-सगळ्यांना बोलवतात, या जेवण करा, गप्पा मारतात, अशी आपली खाद्यसंस्कृती एकमेकांना जोडते, याकडे आमदार तांबे यांनी लक्ष वेधलं.
पक्ष कार्यालयात देखील जेवणाची सोय असते. सायंकाळी स्पेशल डिनर ठेवतात. सभापतींकडे आमंत्रण असते, आमदार-खासदार यांचे जेवण असतं. नागपूरमध्ये अधिवेशन काळात एक दिवस दर्डा परिवाराकडून जेवण असतं. स्थानिक आमदारांकडून आमंत्रण असते. विकास ठाकरेंकडून जेवण असतं, हे सांगताना सत्यजीत तांबे यांनी डिनर डिप्लोमेसीचं जगाच्या राजकारणात महत्त्व वाढल्याचे अधोरेखित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.