Ahilyanagar Karjat politics : 'NCP' अन् 'Congress'च्या बंडखोर नगरसेवकांचा 'BJP' मध्ये लवकरच प्रवेश; राम शिंदे तारीख ठरवणार

NCP-Congress Councillor Ram Shinde to Join BJP in Ahilyanagar Karjat : कर्जत नगरपंचायतीमध्ये बंडखोर नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निश्चित केले आहे.
Ahilyanagar Karjat politics
Ahilyanagar Karjat politicsSarkarnama
Published on
Updated on

Karjat Nagar Panchayat news : बंडखोरीनंतर सत्तेत आलेल्या नगरसेवकांनी भाजपची वाट निश्चित केली आहे. कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांची सत्तेला सुरुंग लावणारे प्रवीण घुले यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.

नगराध्यक्ष रोहिणी घुले आणि उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यासह सर्व बंडखोर नगरसेवक यावेळी उपस्थित होते. विधान परिषदेचे आमदार तथा सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भाजपमध्ये प्रवेश होईल, असेही प्रवीण घुले यांनी सांगितले.

कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या गटाची सत्ता होती. नगरसेवकांनी बंडखोरी करत उषा राऊत यांची सत्ता उलथवून लावत, भाजपचे राम शिंदे यांच्या मदतीने वेगळी चूल मांडली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस नगरसेवकांच्या बंडखोरीला भाजपच्या दोन नगरसेवकांचं बळ मिळालं अन् कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्तांतर घडलं.

प्रवीण घुले म्हणाले, "कर्जत नगरपंचायतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून विकासाचे काम होत नव्हती. नगरसेवकांमध्ये तत्कालीन नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यासह लोकप्रतिनिधीवर रोष होता. नगरसेवकांनी कामे अडवली जाणे, त्यास प्रतिसाद न मिळणे, तक्रारी करून देखील त्यावर कार्यवाही होत नसल्याने 15 पैकी 11 नगरसेवकांनी सत्तेतून बाहेर पडत, उठाव केला".

Ahilyanagar Karjat politics
BJP Sujay Vikhe On Ajit Pawar : सुजयदादा अजितदादांसाठी मैदानात, 'टार्गेट' करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, 'ठाकरे अन् पवारांच्या नेत्यांना लग्नपत्रिकाच नसते

भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर सगळ्याच नगरसेवकांनी विश्वास ठेवत, त्याप्रमाणे निर्णय घेण्याची भूमिका मांडली. सभापती राम शिंदे यांनी कसलीच अटी किंवा शर्त न ठेवता मान्यता दिली. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले आणि उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संतोष मेहेत्रे यांची बिनविरोध निवड केल्याचे प्रवीण घुले यांनी सांगितले.

Ahilyanagar Karjat politics
Sujay Vikhe on Satyajeet Tambe BJP : सत्यजीत तांबेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा; विखे म्हणाले, 'मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी...'

राम शिंदे पक्ष प्रवेशाची तारीख ठरवणार

या सर्व नगरसेवकांची बैठक होत मतदारसंघात सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आणि काँग्रेसच्या तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रवीण घुले यांनी यावेळी दिली. राम शिंदे लवकरच पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित करतील, असेही घुले यांनी सांगितले. नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, सतीश पाटील यांच्यासह सुनील शेलार, लालासाहेब शेळके, रवींद्र सुपेकर, भूषण खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जे पेरले तेच उगवले; प्रवीण घुलेंचा टोला

कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवारांनी कायम सुडाचे राजकारण केले. मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांना सापत्न वागणूक दिली. तसेच पदाधिकारी निवडीत देखील दुय्यम स्थान दिल्याने, सव्वा तीन वर्षात त्यांनी जे पेरले, तेच सर्व सत्ताधारी 11 नगरसेवकांनी त्यांच्या गटातून बाहेर पडत, परतफेड करीत सत्तांतर घडवल्याचे प्रवीण घुले यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com