Satyajeet Tambe Vs Amir Shaikh : भाजपची 'बैसाखी' घेत, सत्यजीत तांबेंनी काँग्रेसशी गद्दारी केली; अमीर शेख यांनी 'AB' फॉर्म किस्सा सांगत बुरखा फाडला (VIDEO)

Congress NSUI President Amir Shaikh Accuses Satyajeet Tambe of Avoiding Congress AB Form in Nashik Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवताना सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसबरोबर गद्दारी केल्याचा आरोप NSUI अध्यक्ष अमीर शेख यांनी केला.
Satyajeet Tambe Vs Amir Shaikh
Satyajeet Tambe Vs Amir ShaikhSarkarnama
Published on
Updated on

Nashik graduate constituency election : नाशिक पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढविताना, सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक न लढवता, अपक्ष लढली. यात ते विजयी देखील झाले. या निवडणुकीवेळी बरच काही राजकारण घडलं.

सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसच पक्षाचा 'AB' फॉर्म का डावलला, याचा उलगडा 'NSUI' अध्यक्ष अमीर शेख यांनी केला आहे. अमीर शेख यांनी, आमदार होण्यासाठी भाजपची बैसाखी घेत, सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस पक्षाची गद्दारी केली, असा गंभीर आरोप करत खळबळ केला.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी सकाळ माध्यम समहूच्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधताना, काँग्रेस नेतृत्व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल गांधी अ‍ॅक्सेसेबलच नाहीत, महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांनी एक तासांत राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधून भेटून दाखवावं, असं चॅलेंज केलं होतं. सत्यजीत तांबे यांच्या या चॅलेंजमुळे महाराष्ट्रातील काँग्रेसमधील वातावरण ढवळून निघालं आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांच्या या आरोपावर बोलताना 'NSUI'चे अध्यक्ष अमीर शेख यांनी जोरदार पलटवार केला. तांबे आणि त्यांच्या परिवाराने काँग्रेस पक्षाची कशी गद्दारी केली, याचा लेखाजोखा मांडताना, नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीचा संदर्भ देत, गंभीर आरोप केले.

Satyajeet Tambe Vs Amir Shaikh
Satyajeet Tambe Rahul Gandhi : राहुल गांधींनी यांना 'गुड मॉर्निंग', 'गुड नाईट', असा मेसेज करावा का? 'NSUI'चे शेख यांनी आमदार तांबेंना धू-धू धुतले (VIDEO)

राहुल गांधींनी यांना का भेटावं?

अमीर शेख म्हणाले, "काँग्रेस पक्षाने त्यांना त्यांच्या नावाचा कोरा 'AB' फॉर्म पाठवला होता. 'AB' फॉर्म पाठवल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला, तो पण भाजपची बैसाखी घेऊन. हे सगळं केलं. काँग्रेस पक्षाला धोका दिला. काँग्रेस पक्षाबरोबर गद्दारी केली. काँग्रेस पक्षाचा विश्वास या परिवार होता, तो विश्वास तोडल्यानंतर राहुल गाधींनी यांना का भेटावासं वाटेल? त्या काळात राहुल गांधी देशातील सर्वसामान्य जनतेला भेटत होते. अशा काळात गद्दारांना कुठं भेटाव, असं वाटत नाही".

Satyajeet Tambe Vs Amir Shaikh
Goa BJP Minister Corruption : गोव्यातील भाजप सरकारमध्ये चाललंय काय? CM सावंतांच्या खात्यावर मंत्री गावडेंच्या आरोपाची दिल्लीत दखल, कारवाईकडे लक्ष...

तांबेंनी काँग्रेस पक्षाची बदनामी केली

संभाजीनगरचा फॉर्म देण्यात आला होता, असा दावा सत्यजीत तांबे यांनी, त्यावेळी केला होता. यावर बोलताना अमीर शेख यांनी हे सर्व खोटं आहे, हा सर्व बनावट प्रसंग उभा करण्यात आला होता. यातून काँग्रेस पक्षाची बदनामी करायची, हा त्यांचा कट आहे. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील त्यांना कोरा 'AB' फॉर्म दिला होता, हे स्पष्ट केलेलं आहे. हा कोरा 'AB' फॉर्म नाशिकचाच दिला होता. पण काहीतरी बोलायचं, कशीतरी आपण हारलेली बाजू जिंकायची, लोकांचं मनं जिंकायचं, म्हणून काहीतरी खोटा बनाव केला आहे, असा दावा केला.

लढाईचे पुरावे त्यांनीच पाहावे

नाशिक पदवीधर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचे 'NSUI' राज्यात कुठे आहे? काय करते आहे? दिसत नाही, असा आरोप केला होता. त्याचा समाचार घेताना अमीर शेख म्हणाले, "सत्यजीत तांबे हे राजीव सातव यांना राजकीय गुरू मानायचे, ते हयात असताना माझ्या कामाचा त्यांनी उल्लेख केला होता. महाराष्ट्रात 'नीट'चे सेंटर सुरू झाले, तेव्हा महाराष्ट्राला सहा सेंटर मिळाले होते. तेव्हा राजीव सातव यांनी महाराष्ट्रासाठी लोकसभेत आणि मी महाराष्ट्रात 'NSUI' माध्यमातून लढाई लढली. यानंतर महाराष्ट्रातील सहा सेंटर 12 केले. या लढाईचे पुरावे त्यांनी पाहावे".

27 जिल्ह्यांमध्ये बेरोजगार यात्रा

'कोविडच्या परिस्थितीमध्ये पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना 'NSUI' माध्यमातून आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदत केली होती. यानंतर देखील आॅफलाईन परीक्षाचा गोंधळ सात विद्यापीठात सुरू असताना, आम्ही चार विद्यापीठात आंदोलन केले. त्याचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा झाला. यानंतर 2019 मध्ये राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये बेरोजगार यात्रा काढली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कलेक्टर कार्यालयात पायी जाऊन निवेदन दिले. याच्यापेक्षा जास्त काय करावं, असा सवाल अमीर शेख यांनी आमदार तांबेंना केला.

फक्त मी... मी... अन् मी...

'आम्ही स्वतःसाठी राजकारण करत नाही. आम्ही लोकांसाठी, युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी लढतोय. फक्त मी... मी... अन् मी.., असं करत नाही. विधान परिषद आली किंवा विधानसभा आली की, मला तिकीट पाहिजे, युवक काँग्रेसची निवडणूक आली की, मला थांबायचंय, हे असं आमचं राजकारण होत नाही. आम्ही काँग्रेस पक्षासाठी, सर्वसामान्यांसाठी, युवकांसाठीच आहे, त्यापलीकडे आम्ही जात नाही', असे म्हणत अमीर शेख यांनी तांबेंना चांगलेच सुनावलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com