Nashik Hit & Run Case: तपास संशयाच्या भोवऱ्यात, मद्यपी वाहन चालकाचा अहवाल कोणी रखडवला?

Police Investigation Delayed: पुणे शहरातील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्येही तशीच घटना घडली आहे. यातील तपास ही अनाकलनीय रित्या रखडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोले जात आहे.
Accident News
Accident NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News :  शहरातील सातपूर भागातील शिवाजीनगर येथे दोन आठवड्यांपूर्वी गंभीर घटना घडली होती. यामध्ये मध्यरात्री अती मद्य सेवन केलेल्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि  हे वाहन थेट एका घरात शिरले. त्यात लहान बालकासह दोन ज्येष्ठ साखर झोपेत असतानाच त्यांच्यावर हे संकट कोसळले.

यामध्ये मद्यपी वाहन चालक आणि बांधकाम व्यवसायिकाशी संबंधित जगदीश खरमाडे यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून त्याला अटक होऊ शकलेली नाही. त्याची अटक रोखण्यासाठी कारणीभूत ठरल आहे तो रखडलेला मद्य प्राशन रक्त अहवाल.

या संदर्भात मद्यपी वाहन चालक आणि बांधकाम व्यवसाय जगदीश खरमाडे यांच्या रक्ताचा नमुना न्याय वैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रयोगशाळेकडून तो प्राप्त होऊ शकलेला नाही. हा अहवाल दोन आठवडे रखडल्याने पोलीस तपासावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

न्यायवैद्यक शाखेकडून रक्त तपासणीचा अहवाल दीर्घकाळ रखडल्याचे दिसते. याबाबत संबंधित प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता, त्यांनी लवकरच हा अहवाल देण्यात येईल असे सांगितले. मात्र हा छोटासा अहवाल देण्यासाठी एवढ्या कालावधी का लागला? याचे उत्तर मात्र मिळू शकलेले नाही.

Accident News
Narendra Modi Politics : कांदा प्रश्नावर पंतप्रधान मोदींना घरचा आहेर... भाजप नेत्यांनी टोचले कान !

या विलंबाचा लाभ संबंधित संशयित आरोपीला होत आहे. त्यामुळे कोणताही दोष नसताना या अपघातात जखमी झालेल्यांना न्याय मिळण्यास विलंब होत आहे.  हा विषय चर्चेचा विषय बनला आहे. हा अहवाल केव्हा प्राप्त होणार त्याच्या विलंब मागे कोणाचा दबाव आहे की काय असे प्रश्न विचारले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com