Nashik Tribal Protest : थेट पोलिस स्टेशनवर दगडफेक, नाशिकमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण

Nashik Kalwan tribal protest : नाशिकच्या कळवण मध्ये झालेल्या आदिवासी आंदोलनाने आज हिंसक वळण घेतले. दगडफेकीत काही पोलिस कर्मचारी व पत्रकार जखमी झाल्याची माहिती आहे.
Nashik Kalwan tribal protest
Nashik Kalwan tribal protestSarkarnama
Published on
Updated on

Nashik Tribal Protest : नाशिकच्या कळवण मध्ये देखील नंदुरबारच्या आदिवासी आंदोलनाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. येथील आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागले. यात आंदोलकांनी थेट पोलीस स्थानकावर दगडफेक केली. दगडफेकीत पोलिस कर्मचारी व पत्रकार जखमी झाले. तसेच पोलिस वाहनाच्या काचाही फुटल्या.

काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने आदिवासी शेतमजुराचे अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू होते. तक्रार दाखल करूनही योग्य ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आंदोलकांचा रोष उसळला. या आंदोलनादरम्यान, पोलिस आणि आंदोलकामध्ये झालेल्या शाब्दिक वादातून ही दगडफेक झाल्याचे समजते. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, पोलीस व आंदोलनकर्त्यामध्ये वाद होऊन तणाव निर्माण झाला. यावेळी संतप्त आंदोलकांनी थेट पोलीस स्थानकावरच दगडफेक केल्याने एकच धावपळ उडाली. जमावाने पोलिसांवर दगडफेक करत ठाण्याच्या आवारातही घुसण्याचा प्रयत्न केला.

Nashik Kalwan tribal protest
Ajit Pawar Politics : अजित पवारांच्या निर्णयावर नाराज, नाशिकचे तीनही खासदार थेट फडणवीसांकडे तक्रार करणार

या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी झाले आहेत. तर पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्या. या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सध्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे.

Nashik Kalwan tribal protest
Nashik Market Committee : मीच 6 महिन्याच्या कारभारावर तक्रार करणार ; चुंबळे विरुद्ध पिंगळे युद्ध पुन्हा भडकलं

काही दिवसांपूर्वी नंदुरबारमध्येही अशीच घटना घडली होती. आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पंरुतु त्या मोर्चालाही हिंसक वळण लागलं होतं. पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली होती. बंदोबस्ताला असलेल्या पोलिस आणि उपद्रव्यांमध्ये दगडफेक झाली होती. पोलिसांनी जमावाला कंट्रोल करण्यासाठी अश्रु धुराच्या नळकाड्या फोडल्या होत्या. राज्यभरात या हिंसक आंदोलनाची चर्चा झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com