Nashik Kotwal Bharti : नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदांची भरती; 156 जागा, कुठे कराल अर्ज, काय आहे पात्रता?

Nashik Kotwal Bharti 2026 : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या कोतवाल पदांची भरती केली जाणार आहे, अर्ज प्रक्रिया सुरु आहे.
Maharashtra Revenue Department Recruitment 2112 Kotwal
Maharashtra Revenue Department Recruitment 2112 KotwalAI
Published on: 
Updated on: 

Nashik Kotwal Bharti 2026 : नाशिक जिल्ह्यातील रिक्त १५६ महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती २०२६ प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांतील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली असून १७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आहे.

इच्छुक उमेदवारांनी विहित कालावधीत nashik.kotwal.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध सुविधेचा वापर करून अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

महसूल सेवक (कोतवाल) भरती समिती तथा संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्थ तालुक्यातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कोतवाल भरतीच्या तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातील १८ ते ४० वर्षे वयोगटातील इच्छुक उमेदवार तसेच इतर जात प्रवर्गातील उमेदवारांना शासनाने वेळोवेळी शिथिल केलेल्या वयोमर्यादेनुसार अर्ज करता येणार आहे.

तसेच, उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गासाठी अर्ज करीत आहे, त्या प्रवर्गासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. ज्या रिक्त जसे साठी उमेदवार अर्ज करीत आहे, त्या सजेमध्ये संबंधित उमेदवाराचा रहिवास असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज भरताना जाहिरात काळजीपूर्वक वाचून आवश्यक ती माहिती अचूक भरावी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. निकष पूर्ण न करणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येऊ शकते.

Maharashtra Revenue Department Recruitment 2112 Kotwal
Nashik News : नाशिकमध्ये पिवळ्या पाण्याची दहशत ; परिस्थिती पाहून पालकमंत्री महाजनही चिंतेत, हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महसूल सेवक (कोतवाल) भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारी माहिती अथवा अफवा पसरविण्यात येत असल्यास त्यावर विश्वास न ठेवता खात्री करण्यासाठी संबंधित अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

पदाची माहिती व पात्रता निकष

शैक्षणिक अर्हता

उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला).

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. शासन निर्णयानुसार आरक्षित संवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट राहील.

Maharashtra Revenue Department Recruitment 2112 Kotwal
Nashik football ground : पालकमंत्री गिरीश महाजनांची किक, नाशिकमध्ये साकारणार फुटबॉलचे अत्याधुनिक मैदान

स्थानिक रहिवासी (Nashik)

उमेदवार ज्या सज्जातील गावासाठी अर्ज करत आहे, त्या संबंधित गावाचा / सज्जाचा स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे.

शारीरिक सक्षमता

उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ व सक्षम असावा, तसेच सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com