Nashik Kumbh Mela : फडणवीस, भुजबळ की महाजन? नाशिकमधील शाहीस्नानाच्या तारखा जाहीर करण्याचा मान कुणाला, काय ठरलं?

Kumbh Mela 2027: Decision Meeting Scheduled in Nashik : नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. प्रयागराज इथल्या महाकुंभ पाठोपाठ 2026-27 ला नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.
Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis, Girish Mahajan, Nashik Kumbh Mela
Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. प्रयागराज इथल्या महाकुंभ पाठोपाठ 2026-27 ला नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याच्या तारखांची अनेकजण उत्सुकतेने वाट पाहात आहेत. त्यात नाशिकमधील शाहीस्नानाच्या तारखांची घोषणा कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ते आता ठरलं आहे.

नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असल्याने पालकमंत्रीपदावरुन मोठी रस्सीखेच सुरु आहे. त्यात आता मंत्री झाल्याने छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्री केलं जाईल तर छगन भुजबळ यांना पालकमंत्री केलं जावू शकतं अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. कुंभमेळा जवळ आल्याने लवकर काय तो निर्णय घेणं अपेक्षित असताना मात्र पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेण्यात विलंब होत आहे.

अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेरा आखाड्यांचे 26 प्रतिनिधी यांची नाशिकमध्ये 1 जूनला बैठक होणार आहे. या बैठकीत नाशिकमधील शाहीस्नानाच्या तारखा घोषित केल्या जाणार आहेत. फडणवीसांच्या प्रमुख बैठकीत आखाड्यांची बैठक होत असल्याने त्यांनाच या तारखा जाहीर करण्याचा मान मिळणार आहे. या बैठकीमुळे सिंहस्थाच्या तयारीला गती येणार आहे व कुंभमेळ्याचे नियोजन स्पष्ट होईल.

Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis, Girish Mahajan, Nashik Kumbh Mela
Gulabrao Patil : पक्षात घेतलेले जळगावचे लोकही तपासा, हगवणे प्रकरणानंतर गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना सल्ला

नाशिक व त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. त्र्यंबकेश्वर येथील आखाडे व पुरोहित संघातर्फे तेथील शाहीस्नानाच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या. पण, नाशिकच्या तारखा घोषित करण्यासाठी मुहूर्त लागत नव्हता. त्यामुळे साधू-महंतांमध्ये तीव्र नाराजीचा सुर होता. याबाबत साधू-महंतांनी वेळोवेळी आपली नाराजी प्रशासनाकडे व्यक्तही केली. परंतु, कुंभमेळ्याच्या तयारीत गुंतलेल्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष झाले.

चालू महिन्याच्या सुरुवातीला हरिद्वार येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विशेष बैठक घेण्याचा आणि शाहीस्नानाच्या तारखा ठरवण्याचा निर्णय झाला. या निर्णयाची माहिती राज्य शासनाला देण्यात आली असून, लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याची मागणीही करण्यात आली होती.

Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis, Girish Mahajan, Nashik Kumbh Mela
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांनी कृषिमंत्री कोकाटेंच्या वर्मावरच ठेवले बोट, म्हणाले, सतत घर बदलणाऱ्यांना...

या पार्श्वभूमीवर अखेर ही बैठक निश्चित झाली आहे. येत्या 1 जून रोजी नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, अखाडा परिषदेचे 26 प्रतिनिधी, स्थानिक साधू-संत, महंत आणि नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघ यांची एकत्र बैठक होणार आहे. या बैठकीत शाहीस्नानाच्या तारखा अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com