Nashik Kumbh Mela : भाजपकडून नाराजांवर मलमपट्टी ; भुजबळ, भुसे, कोकाटे कुंभमेळा मंत्री समितीवर

BJP strategy : 2027 मध्ये नाशिकयेथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांची एक समिती स्थापन केली असून आता स्थानिक मंत्र्यांना त्यात स्थान देण्यात आलं आहे.
Dada Bhuse,Manikrao Kokate,Chhagan Bhujbal
Dada Bhuse,Manikrao Kokate,Chhagan BhujbalSarkanama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन काम पाहत आहेत. कुंभ नियोजनापासून महाजन हे इतर महायुतीतील स्थानिक मंत्र्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवत असल्याचे अनेकदा आरोप झाले. त्यामुळेच सुरुवातीपासूनच महायुतीतील स्थानिक मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी भाजपने एक पाऊल टाकले असून राज्य शासनाने कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समिती या दोन महत्त्वाच्या समित्यांची स्थापना केली आहे.

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री आणि समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर या समितीत छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि जयकुमार रावल यांना स्थान देण्यात आले आहे. यातून भाजपने नाराज स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करताना भाजपने सुरुवातीपासून अन्य कुणालाही फारसे विश्वासात घेतले नाही. कुंभनियोजनाच्या सर्व बैठका आजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीच घेतल्या. या बैठकांना विरोधी पक्षातील खासदार तसेच स्वपक्षाच्या आमदारांनाही भाजपने दूर ठेवलं. त्यामुळे बोलून दाखवत नसले तरी कुठेतरी भाजपच्या आमदारांमध्येही त्यावरुन नाराजी आहे.

Dada Bhuse,Manikrao Kokate,Chhagan Bhujbal
Nashik Kumbh Mela : भुजबळांनी बैठक गाजवली, आता मुख्यमंत्री फडणवीस घेणार कुंभ आखाड्यात उडी

महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दादा भुसे हे स्थानिक असून त्यांनाही कधी भाजपने विश्वासात घेतले नाही. त्यातूनच कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा, बैठका आणि कामांच्या कंत्राटांवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन हे नेहमी बैठक घेत असता, मात्र या बैठकीत प्रशासनातील अधिकारी वगळता कुणालाही अधिकृत आमंत्रण नसतं. त्यामुळे आता नाशिक मधील स्थानिक हेवीवेट मंत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी या समितीत त्यांना वर्णी लावण्यात आल्याचे दिसते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मानापमानावरुन महायुतीमधील मंत्र्यांमध्ये खटके उडू लागले होते. त्याचाच भाग म्हणून मंत्री भुजबळांनी देखील कुंभमेळासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालायात बैठक घेत काही सूचना केल्या होत्या आणि काम जलदगतीने होत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला स्थानिक मंत्री म्हणून बैठक घेण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी सुनावलं होतं.

तर त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कुंभ नियोजनाच्या आखाड्यात उडी घेत नाशिकमध्ये बैठक घेतली होती. विशेष म्हणजे या बैठकीत गिरीश महाजन यांना आमंत्रण नव्हते. यामुळे महायुतीमधील नेत्यांमध्ये चढाओढ दिसून आली होती.

Dada Bhuse,Manikrao Kokate,Chhagan Bhujbal
Nashik Kumbh Mela 2027 : दिल्लीत झालेली चूक नाशिकमध्ये सुधारली : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय

तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट नियोजन व प्रभावशाली अमंलबजावणी व्हावी यासाठी शिखर समितीची देखील स्थापना करण्यात आली असून अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच विविध विभागांचे सचिव व अधिकारी यांचा समावेश या समितीत करण्यात आला आहे.

सिंहस्थ कुंभमेळयाच्या नियोजन आराखड्यास मंजूरी देणे, सिंहस्थ कुंभमेळयाच्या मंजूर नियोजन आराखडयाच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेणे, सिंहस्थ कुंभमेळयाच्या आयोजनाच्या अनुषंगाने इतर अनुषंगिक बाबी, कामांच्या दर्जा व गुणवत्ताबाबत आढावा घेणे आधी कार्य शिखर समितीच्या कार्यकक्षेत आहे. दरम्यान याआधी कुंभमेळा प्राधिकरणाचीही स्थापना झाली असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाला आता अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com