Girish Mahajan : नाशिकच्या खोदलेल्या रस्त्यांवरून महाभारत : राऊतांनी दणका देण्याची तयारी करताच महाजनांनी बाह्या सरसावल्या

Girish Mahajan Nashik road controversy : संजय राऊत यांनी सिंहस्थ कुंभमेळा हा फक्त भ्रष्टाचारासाठी निविदा काढणे आणि ठेकेदारांना कामे देणे हा विषय असल्याचा आरोप करत नाशिक शहरात मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
Girish Mahajan responds to Sanjay Raut over Iran-Israel war remarks, assures safe return of stranded Indians.
Girish Mahajan responds to Sanjay Raut over Iran-Israel war remarks, assures safe return of stranded Indians.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांमुळे शहरातील बहुतांश रस्ते खोदण्यात आले आहेत. त्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. या प्रश्नावरून महासभेत देखील गोंधळ झाला होता.

शहरात कुंभमेळ्याच्या कामांसाठी खोदलेले रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे आतापर्यंत सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेत आंदोलन केले. त्यानंतर शिवसेना गटनेते केशव पोरजे यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा केली होती.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सिंहस्थ कुंभमेळा हा फक्त भ्रष्टाचारासाठी निविदा काढणे आणि ठेकेदारांना कामे देणे हा विषय झाला आहे. नागरिकांचा आणि शहराच्या विकासाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे या प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे म्हटले होते.

महापालिका आयुक्त, महापौर आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना शिवसेना ठाकरे पक्ष दणका देईल. त्यासाठी नाशिक शहरात मोठे आंदोलन करण्याची घोषणा खासदार राऊत यांनी केली होती. पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्याला प्रत्युत्तर दिले.

Girish Mahajan responds to Sanjay Raut over Iran-Israel war remarks, assures safe return of stranded Indians.
Girish Mahajan : हा अधिकारी असा, तो मंत्री तसा.. बोलताना माहिती घेऊन बोला.. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचा साधूंना सल्ला

कुंभमेळा मंत्री महाजन म्हणाले, कुंभमेळ्याच्या कामांमध्ये नियमानुसार 40% कमी दराने कंत्राट दिले गेले. त्यामुळे त्यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. खासदार राऊत हे फक्त चर्चेत राहण्यासाठी टीका करीत आहेत.

खासदार संजय राऊत यांचे आव्हान स्वीकारत मंत्री महाजन यांनी राऊत यांनी एक तरी आंदोलन करावे, असे आव्हान दिले. खासदार राऊत यांनी केवळ टीका करण्यापेक्षा नाशिक मध्ये येऊन आंदोलन करावे. म्हणजे त्यांना खरी परिस्थिती कळेल.

Girish Mahajan responds to Sanjay Raut over Iran-Israel war remarks, assures safe return of stranded Indians.
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या कार्यालयासमोर पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या ; महाजनांचा पारा चढला, सुनावले खडे बोल..

सिंहस्थ कुंभमेळा जवळ येऊ लागल्याने शहरातील खोदलेले रस्ते आणि विकास कामे हा आता कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे विरोधक हा मुद्दा ठेवून राजकारण करीत आहे. विरोधी पक्षांना सत्ताधारी पक्षाविरुद्ध आंदोलनाची ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

विशेष म्हणजे राज्यात आणि महापालिकेत भाजप व समवेत सत्तेत असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षही या प्रश्नावर आक्रमक असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com