Girish Mahajan : हा अधिकारी असा, तो मंत्री तसा.. बोलताना माहिती घेऊन बोला.. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचा साधूंना सल्ला

Girish Mahajan Nashik Kumbh Mela : नाशिकच्या कुंभमेळ्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे काम काही लोक करीत असल्याचा आरोप मंत्री महाजनांनी केला. तसेच साधूंनाही त्यांनी काही सल्ला दिला आहे.
Girish-Mahajan
Girish-MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela : नाशिकच्या कुंभमेळ्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे काम काही लोक करीत असल्याचा आरोप कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करु पण, कुंभमेळ्यात राजकारण नको, अशी माझी विनंती असल्याचे कुंभमेळा मंत्री महाजन यांनी म्हटले आहे.

विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरात असलेल्या महाजन यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते, ते म्हणाले, कुंभमेळ्याला अजून एक वर्षाचा अवधी आहे. प्रशासन अगदी वेगाने व गतीने काम करत आहे. कुठलीही उसंत आम्ही घेत नाही. त्यामुळे काहीच काम झाले नाही, असे म्हणण्यापेक्षा साधू-महंतांनी आम्हाला समजून घ्यावे.

साधू-महात्म्यांचे काम कुंभमेळा करणे आहे. त्यांना सेवा पुरविणे आमचे काम आहे. आम्ही त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलतो आहोत. तेथे नवीन घाट होत आहेत. सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करीत आहोत. हा अधिकारी असा, तो मंत्री तसा असे बोलण्यापेक्षा साधूंनी माहिती घेऊन बोलायला हवे असे महाजन यांनी म्हटले.

Girish-Mahajan
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या कार्यालयासमोर पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या ; महाजनांचा पारा चढला, सुनावले खडे बोल..

कुंभमेळ्याच्या संदर्भात साधूंनी ज्या ज्या मागण्या केल्या, त्या मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केल्या आहेत. त्यात कुठेही हात आखडता घेतलेला नाही. मागच्या वेळेला एक-दोन कोटी रुपये दिले होते. यावेळी पाच कोटींची मदत आखाड्यांना केली आहे. त्यांनी जितका निधी मागितला तितका दिला आहे. निवारा, स्वच्छतागृह, आवश्यक सुविधांसाठी हा निधी देत आहोत. गतवेळेला सिंहस्थासाठी साडेतीन हजार कोटी दिले होते. यंदा ३५ हजार कोटी दिले आहेत. नवनवीन कामे समाविष्ट होत असून, आम्ही कुठेही हात आखडता घेत नसल्याचे, महाजन यांनी स्पष्ट केलं.

कुंभमेळ्याची सर्व कामे वेळेत पूर्ण केली जातील. साधू-महंताच्या मागण्याही प्राधन्याने पूर्ण करण्यात येतील. कुंभमेळ्याच्या विविध कामांसाठी मोठी स्पर्धा झाली असून, नियमानुसार आणि कायदेशीर प्रक्रियेतूनच ठेके देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. एखादा गुजराती ठेकेदार कामात सहभागी असल्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण कुंभमेळ्याच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Girish-Mahajan
Girish Mahajan News : पत्रकार बूम घेऊन मागे मागे, मंत्री गिरीश महाजन पुढे पुढे... कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर बोलती बंद?

दरम्यान, नाशिक परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन अनेकजण घराबाहेर पडले होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com