

Jalgaon Students Protest : जळगावात पोलीस भरतीचा सराव करणारे तरुण व मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गिरीश महाजन यांना विद्यार्थ्यांनी घेराव घातला असून संतप्त मंत्री महाजन विद्यार्थ्यांना खडेबोल सुनावताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे संकटमोचक महाजन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने सिंथेटीक ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. येथे पोलिस भरतीच्या सरावासाठी विद्यार्थी येतात. जिल्हा क्रीडा संकुलात प्रवेश शुल्क दीडशे रुपयांवरुन थेट ६०० रुपये केल्याने तरुण आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शुल्क कमी करून 300 रुपये करावे, अशी मागणी यादरम्यान त्यांनी केली.
शुल्क कमी करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पत्र देत मागणी केली होती. मात्र, याबाबत तोडगा काढून शुल्क कमी करण्याबाबत निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मंत्री महाजन यांच्याकडे मोर्चा वळवला.
विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर रस्तारोको करत घोषणा दिल्या. त्यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक खोळंबल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, महाजन यांनी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांना खडे बोल सुनावले. आंदोलनाची पद्धत चुकीची असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. गुन्हा दाखल झाल्यास पोलिस विभागात भरती होता येणार नाही या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना सुनावले. यावेळी चर्चा करण्यावरून कोणी पुढे जायचे यावरून बरीच ताणाताणी झाल्याचेही दिसले.
मंत्री महाजनांनी आधी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणाऱ्यांमधील तीन ते चार विद्यार्थ्यांना चर्चेसाठी कार्यालयात बोलविले, परंतु चर्चेसाठी न जाता येथेच आंदोलन करणार, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे रस्त्यावर गोंधळ व रहदारी खोळंबल्याने मंत्री महाजन यांनी कार्यालयाबाहेर येत विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
मंत्री महाजन यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी चौधरी यांना कार्यालयात बोलावून चर्चा केली. परंतु, सिंथेटीक ट्रॅक तयार करण्यास लागलेला खर्च व सरावादरम्यान त्याचे नुकसान झाल्यास दुरुस्तीसाठीची अडचणीचा मुद्दा मांडला. तरीदेखील काही प्रमाणात शुल्क कमी करण्याबाबत विचाराधीन असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी चौधरी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.