Nashik Kumbh Mela : शेतकऱ्यांच्या 'त्या' मागणीमुळे कुंभमेळ्याच्या कामांना ब्रेक? नाशिक महापालिकेचा जुना कारभार अंगलट येण्याची शक्यता

Kumbh Mela Land Acquisition Row : महापालिकेने काही शेतकऱ्यांची व्यक्तिशः वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी संघटित होत आंदोलनाचा इशारा दिला आहे. संदर्भात शेतकऱ्यांनी संघटितपणे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे महापालिका कुंभमेळ्याच्या तयारीबाबत स्वतःच्याच अकार्यक्षम आणि डीसाळ कारभाराच्या जाळ्यात अडकल्याचे चित्र आहे.
Nashik Kumbh Mela | Land Acquisition Row
Nashik Kumbh Mela | Land Acquisition RowSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 20 Sep : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महापालिकेच्या तयारीत शेतकऱ्यांनी मोठा खोडा घातला आहे. महापालिकेचा ढिसाळ कारभार प्रशासनाच्या अंगलट आला. त्यामुळे ध्वजारोहणाच्या आधीच कुंभमेळ्याची तयारी रखडण्याची चिन्हे आहेत.

कुंभमेळा साधू ग्राम आणि रस्त्यांसाठी भूसंपादन सुरू झाले आहे. मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक होत या कामाला लाल झेंडा दाखवला आहे. आधी पैसे द्या मग जमीन घ्या या भूमिकेने महापालिकेची कोंडी झाली आहे. महापालिका प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना पैसे देताना सढळ हाताने व्याजासह पैसे दिले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहाराचा आरोप झाला. महापालिका आयुक्तांपासून तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांपर्यंत अनेकांवर आरोप झाले.

Nashik Kumbh Mela | Land Acquisition Row
ZP Election : तालुका अध्यक्षांना गाड्या वाटत शिवसेनेच्या आमदाराकडून ZP ची तयारी; पण सर्वाधिक आमदार असलेली राष्ट्रवादी गोंधळलेली

मात्र हीच महापालिका शेतकऱ्यांना पैसे देताना ढिसाळ कारभार करीत आहे. २००३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी संपादित रस्ते आणि अन्य कामांच्या जमिनींचे पैसे रखडविले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण नाशिक महापालिकेच्या गळ्याशी आले आहे. महापालिका प्रशासना पुढे सहा महिन्यांवर आलेल्या कुंभमेळ्याच्या कामात शेतकऱ्यांनी मोठा अडथळा निर्माण केला आहे. "आधी पैसे द्यावेत नंतर जमीन मिळेल" अशी कणखर भूमिका घेतल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे.

या संदर्भात स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समाधान जेजुरकर यांनी महापालिकेच्या प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे. संदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत प्रशासनाला तातडीने पैसे अदा करण्याची सूचना केली आहे.

Nashik Kumbh Mela | Land Acquisition Row
Government Scheme : शेतात जाण्याची वाट अडवली? सरकारचा ॲक्शन प्लॅन तयार! थेट ‘सीमांकन ते अतिक्रमणमुक्ती’

महापालिकेने काही शेतकऱ्यांची व्यक्तिशः वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी संघटित होत आंदोलनाचा इशारा दिला आहे. संदर्भात शेतकऱ्यांनी संघटितपणे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे महापालिका कुंभमेळ्याच्या तयारीबाबत स्वतःच्याच अकार्यक्षम आणि डीसाळ कारभाराच्या जाळ्यात अडकल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com