Hemant Gaikwad News: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधूग्रामच्या उभारणीसाठी तपोवनातील सतराशे झाडे तोडली जाणार आहेत. महापालिका प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला समाजातून मोठा विरोध होत आहे.
नाशिक शहरातील तपवनातील साधूग्राममध्ये गेल्या कुंभमेळ्यात नागरिकांनी वृक्षारोपण केले होते. येथे काही जुनी वड, पिंपळ व अन्य वृक्ष देखील आहेत. गेल्या बारा वर्षांपूर्वी तसेच त्याआधीची लागवड केलेली १७०० झाडे आता प्रशासनाच्या नजरेत खुपू लागली आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने ही झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. त्याला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. राज्यभरातून त्याला प्रतिसाद वाढतो आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र वृक्षतोडीचे समर्थन केले.
वृक्षतोडीवरून विविध मतप्रवाह निर्माण झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते हेमंत गायकवाड यांनी त्यासाठी सुवर्णमध्य सुचवला आहे. साधूंसाठी तत्पुरत्या झोपड्या उभारल्या जातात. त्यासाठी झाडे तोडण्याची आवश्यकता नसते.
साधू ग्राम मध्ये उभारल्या जाणाऱ्या राहुट्या तत्पुरत्या व कापडाच्या असतात. कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम नसते. मोठे तंबू देखील प्रीकास्ट प्रकारचे असतात. त्यासाठी झाडे तोडण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे झाडे तोडण्याचा पर्याय रद्द करावा असे त्यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाच्या झाडे तोडण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या विरोधात चिपको आंदोलन झाले. विविध राजकीय नेत्यांनीही झाडे तोडण्यास विरोध केला आहे.
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. मंत्री महाजन यांनी झाडे तोडल्यास एका झाडाच्या तुलनेत दहा झाडे लावण्यात येतील असे म्हटले आहे. हे विधान बेजबाबदारपणाचे असल्याची टीका शिंदे यांनी केली होती.
झाडे न तोडताही साधू ग्राम येथे साधूंची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. विविध पर्याय उपलब्ध असताना महापालिका झाडे तोडण्याचा अट्टहास का करते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विरोधात शहरात संताप वाढत असल्याने झाडे तोडण्याला सुचविलेला पर्याय स्वीकारावा अशी मागणी होत आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.