Rajabhau Waje Politics: सिन्नरची निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी गाजतेय, उद्धव ठाकरेंच्या खासदारासाठी वसंत गीतेही उतरले मैदानात!

Sinnar-Municipal- Election-Shivsena- UBT- Rajabhau- Vaje- Challenges- BJP- Uday- Sangle-Vasant-Gite-in campaign-उद्धव ठाकरेंच्या खासदारासाठी शिवसेनेच्या वसंत गिते प्रचाराच्या मैदानात, भाजपला दिले थेट आव्हान, हा भाजपचा उदय नव्हे अस्त!
Vasant Gite & Rajabhau Vaje
Vasant Gite & Rajabhau VajeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Vs BJP News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे हे मवाळ व्यक्तिमत्व मानले जाते. सिन्नर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मात्र ते अचानक आक्रमक झाले. त्यांनी भाजप नेत्यांचा थेट पंचनामाच केला.

सिन्नर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाची सत्ता आहे. यंदा पारंपरिक विरोधक क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी पॅनल उभे केले आहे. मात्र ऐन निवडणुकीत भाजपचे कमळ हाती घेतलेल्या उदय सांगळे यांनी त्यात रंग भरला आहे.

नुकतेच भाजपवासी झालेले उदय सांगळे यांनी वाजे यांना टार्गेट केले होते. त्याला शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी आमदार गीते यांनी खासदार वाजे हे निष्ठावंत नेत्याचे प्रतीक असल्याचे म्हटले.

Vasant Gite & Rajabhau Vaje
Nashik Municipal Election : जागा वाटपावरून तणाव : भाजपकडून फारच कमी जागांची ऑफर, नाराज शिवसेनेचा पुढचा निर्णय कोणता?

खासदार वाजे हे पक्ष आणि समाजाशी असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहेत. पक्षनिष्ठा आणि सिन्नर शहरासाठी त्यांनी वाहून घेतले आहे. शंभर कोटी रुपयांची ऑफर आणि केंद्रात राज्यमंत्रीपद ठोकरणारा हा नेता आहे. या नेत्याला यशस्वी करणे यातच सिन्नरची प्रतिष्ठा आहे.

Vasant Gite & Rajabhau Vaje
Nandurbar Politics: गुजरात पोलिसांच्या कारवाईवर विरोधांचे भाजपला आव्हान, ‘लक्षात ठेवा, कॅप्टन जरी आत असला तरी कोच बाहेर आहे’

खासदार वाजे आणि त्यांच्या कुटूंबियांनी सिन्नर शहराच्या विकासासाठी झोकून देऊन काम केले आहे. शहरासाठी त्यांनी आपले योगदान दिले आहे. या नेत्याला जपणे म्हणजे सिन्नरचे नाव जिल्ह्यात उंचावण्याचे काम आहे.

श्री सांगळे ज्या पक्षात गेले, तो पक्ष गेले १५ वर्षे देशात अन् राज्यात सत्तेत आहे. या पक्षाने केलेली विकास कामे कोणती? हे त्यांनी सांगावे. केवळ तोडफोड करणे, हेच त्यांचे काम आहे. आमदार फोडतात, नगरसेवक फोडतात अन् सत्तेत येतात. या सत्तेचे त्यांनी लोकांसाठी काही केले का?

नाशिक महापालिकेत भाजप सत्तेत होता. आठ वर्षे त्यांनी नाशिक महापालिकेची धुळधान केली. हिंदूत्वाचे भूत उभे करायचे. कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा देऊन तरुणांची माथी भडकवायची. हा पक्ष एव्हढा मोठा असले तर प्रत्येक निवडणुकीत त्यांना तोडफोड का करावी लागते?

उदय सांगळे यांचे राजकीय विरोधक कोण? हा प्रश्न मतदारांपुढे आहे. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार वाजे हे परंपरागत विरोधक आहे. मात्र सांगळे यांनी कोकाटे यांना बाजूला ठेवून थेट खासदार वाजे यांच्यावर व्यक्तिगत टीका केल्याने राजकारण तापले आहे.

श्री सांगळे यांच्या या राजकीय डावपेचांना खासदार वाजे यांनी थेट उत्तर दिले. यानिमित्ताने वाजे यांनी सांगळे यांचा दुटप्पीपणा आणि सोयीनुसार पक्ष बदलणे याचा पंचनामाच केला. यानिमित्ताने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने भाजपला थेट आव्हान दिले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com