Mahavikas Aghadi : महायुतीचं ठरलं, दोघा भावांच्या गोंधळात महाविकास आघाडीचं ठरेना

Mahayuti confirms joint contest in Nashik local elections, MVA yet to finalize strategy amid confusion : ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा आणि दोन राष्ट्रवादी गटांत चाललेली हालचाल यामुळे महाविकास आघाडीमधील अनिश्चितता आणखी वाढली आहे.
Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray
Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Nashik Local Body Elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचे चित्र आहे. महायुतीकडून मात्र स्पष्ट संदेश देण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार दर्शविला आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील महायुतीत सामील होण्याचा संकेत मिळाल्याने, तिन्ही पक्ष एकत्रितपणे मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. याउलट, महाविकास आघाडीत मात्र अजूनही गोंधळ कायम असून काय ते ठरलं नसल्याचं चित्र आहे.

याउलट महायुती जोरदार कामाला लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक एकत्र लढण्याबाबत उघडपणे भूमिका मांडली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनीही तीच भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत याबाबतची माहिती दिली. महायुती म्हणूनच निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर भाजप, शिंदे गट व अजित पवार गटाच्या संयुक्त बैठका व सभा सुरू झाल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि सक्रियता दिसून येत आहे.

Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray
Raj Thackeray Nashik Visit : दोन दिवसांचा नाशिक दौरा राज ठाकरेंनी तीन तासांतच गुंडाळला ; अचानक मुंबईकडे रवाना, काय कारण?

मात्र महाविकास आघाडीकडे पाहिल्यास, अजूनही एकत्र येण्याबाबत कोणतेही ठोस संकेत मिळालेले नाहीत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्यात अद्याप समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. शिवाय, ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा आणि दोन राष्ट्रवादी गटांत चाललेली हालचाल यामुळे अनिश्चितता आणखी वाढली आहे.

त्यात काल राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या संभाव्य युतीबाबत ते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करतील असे वाटत होते. मात्र त्यांनीही तशी काहीही चर्चा केली नसल्याची माहिती मनसे नेते दिनकर पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे त्याबाबतही अनिश्चितता कायम आहे.

Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray
Dhule Cash Controversy: अर्जुन खोतकरांवरील बालंट टळले; धुळे रोकडप्रकरणी फडणवीसांची ‘एसआयटी’ची घोषणा हवेतच?

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिक दौर्‍यावर आलेल्या आमदार रोहित पवार यांनी शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक तयारीचा आढावा घेतला. १० जून रोजी पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर होणार असून, त्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. तोपर्यंत, समविचारी पक्षांशी चर्चा सुरू ठेवण्याचे आणि स्वबळावर लढण्याचीही तयारी ठेवण्याचे निर्देश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील स्थानिकच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की स्वतंत्र यासंदर्भात १० जूनलाच जेष्ठ नेते शरद पवार ठरवतील व भूमिका जाहीर करतील अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे. त्यामुळे १० जूनलाच काय ते महाविकास आघाडीचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com