
Nashik Lok Adalat News : लष्करी सेवेत असलेल्या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी काही वकील पुढे आले होते. संदर्भात कुटुंबीयांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेला चांदवड (नाशिक) येथील रमेश गुंजाळ यांचा चार वर्षांपूर्वी कर्तव्यावर असताना अपघातात मृत्यू झाला होता. ते पत्नी सरला सह चांदवड होऊन नाशिक कडे येत होते. विरुद्ध बाजूने आलेल्या कारणे त्यांना धडक दिली. त्यांचा मृत्यू झाला होता.
संदर्भात चांदवड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या विषयी संबंधित गाडीचा विमा असलेल्या कंपनी विरोधात गुंजाळ यांच्या कुटुंबीयांनी दीड कोटी रुपयांच्या भरपाईचा दावा दाखल केला होता. हा दावा शनिवारी झालेल्या लोक अदालतीत समाविष्ट करण्यात आला.
त्यावर विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि गुंजाळ कुटुंबीय यांचे वकील यांच्यात चर्चा झाली. चर्चेत तडजोडी आणती 95 लाख रुपये भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत झाली.
जिल्हा न्यायाधीश जगमलानी यांच्या हस्ते आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मृत जवान गुंजाळ यांच्या कुटुंबीयांना भरपाईचा धनादेश देण्यात आला. अशाप्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरपाई मिळालेला हा दावा चर्चेचा विषय होता. यानिमित्ताने कर्तव्यवस्थांना अपघातात निधन झालेल्या सीमा सुरक्षा दलाचे गुंजाळ यांना मृत्यूनंतर न्याय मिळाला.
नाशिक येथे शनिवारी झालेल्या लोक अदालतीत 93 प्रकरणांचा तडजोड्यांती निकाल लागला. त्यामध्ये विविध अपघातांमध्ये जखमी झालेले तसेच मृत झालेल्या नागरिकांच्या खटल्याचा समावेश होता. मोटर वाहन न्यायालयातील एक हजार ३५५ दाव्यांपैकी 169 प्रकरणांमध्ये यावेळी निकाल झाला. १२२ प्रकरणांमध्ये तडजोड झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.