Nashik Politics: 'दहा वर्षांत नाशिकमध्ये काहीही विकास नाही, खासदार अकार्यक्षम' ; दिनकर पाटलांच्या आरोपाने महायुतीत तणाव?

Nashik Lok Sabha Constituency : भाजप नेत्यांच्या मतदारसंघाच्या हट्टामुळे भाजप आणि शिंदे गटात वाढती अस्वस्थता
Dinkar Patil Vs Hemant Godse
Dinkar Patil Vs Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : महायुतीचे जागावाटप ठरत नसल्याने नाशिकमधील भाजपचे इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता थेट सहकारी पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रोज नव्या तणाव निर्माण होतो आहे.

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, देशभरातील राजकीय पक्षांची गडबड सुरू झाली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकस आघाडी आणि महायुतीचं जागावाटप सातत्याने लांबतच चालले आहे. जागावाटप लांबल्याने स्थानिक इच्छुकांमध्ये वाढती अस्वस्थता आहे. त्यातून आता या इच्छुकांकडून सहकारी पक्षांवरच टीका केली जाऊ लागल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे. यातून या पक्षांमध्ये ऐक्य वाढण्याऐवजी दुरावा निर्माण होऊ लागल्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dinkar Patil Vs Hemant Godse
Nilesh Lanke News : लोकसभेसाठी नीलेश लंकेंना आमदारकीवर पाणी सोडावे लागणार?

या संदर्भात महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नाशिकची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवेसेनेकडे आहे. येथील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत(Shivsena) फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाणे पसंत केले आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अशा स्थितीत नाशिकचा मतदार संघ आणि उमेदवार जवळपास निश्चित असल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. मात्र त्यांचा प्रचार आता सहकारी पक्ष भाजपलाच खूप लागल्याचे दिसत आहे.

याबाबत भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील(Dinkar Patil) यांनी सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे. भाजप केंद्रात दहा वर्षे सत्तेत आहे मात्र त्यांना पाठिंबा देणाऱ्या नाशिकच्या खासदार अकार्यक्षम आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत नाशिकमध्ये काहीही विकास झालेला नाही. मतदारसंघाचे अपेक्षित प्रश्न सुटलेले नाही. त्यामुळे भाजप हाच पर्याय आहे. अशा आशयाच्या प्रचारातून थेट शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला लक्ष करण्यात आले आहे. पाटील यांच्या या प्रचारामुळे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे अस्वस्थ झाले आहेत.

Dinkar Patil Vs Hemant Godse
Shantigiri Maharaj News: प्रचारात संत जनार्दन स्वामींचा फोटो? शांतीगिरी महाराजांना विरोध

दरम्यान महायुतीच्या घटक पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shide) गटाला लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना कोणतेही उत्तर न देता संघटनात्मक वाढीवर लक्ष देण्याच्या सूचना दिली आहे. भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासून नाशिक मतदार संघ आपल्यालाच मिळेल अशी हवा तयार केली होती. त्यामुळे येथे एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत.

या उमेदवाराकडून सातत्याने वरिष्ठ नेत्यांकडे मतदार संघासाठी आग्रह धरला जात आहे. अशा स्थितीत जागावाटप लांबल्याने महायुतीच्या घटक पक्षांमध्ये परस्परांत तणाव रोज वाढू लागला आहे. त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असे बोलले जाते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com