Nashik Lok Sabha News : हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळण्यासाठी शिवसेना शिंदे गटाची धावाधाव!

Lok Sabha Election 2024 : या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने करण गायकर यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय शांतिगिरी महाराज यांनी देखील अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली आहे.
Nashik Lok Sabha News
Nashik Lok Sabha NewsSarkarnama

Nashik News : नाशिक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे उमेदवार आहेत. गोडसे यांना निवडणूक सोपी व्हावी यासाठी आता पालकमंत्री दादा भुसे हे देखील मैदानात उतरले आहेत. (Lok Sabha Election 2024)

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार गोडसे उमेदवार आहेत त्यांची लढत महाविकास आघाडीचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याशी आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने करण गायकर यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय शांतिगिरी महाराज यांनी देखील अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या मत विभागणीचा फटका कोणाला बसतो, हा सर्वच उमेदवारांसाठी चिंतेचा विषय आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्र्यंबकेश्वर येथील योगेश्वरानंद यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धार्मिक क्षेत्रातील दोन गुरु नाशिक मतदार संघात उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीच्या हिंदुत्ववादी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका शिवसेना शिंदे गटाच्या खासदार गोडसे यांना बसू नये यासाठी पक्षातर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी पालकमंत्री दादा भुसे तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शांतिगिरी महाराज यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी अशी विनंती केली होती. मात्र शांतिगिरी महाराज यांनी त्याला नकार दिला होता.

Nashik Lok Sabha News
Congress Vs BJP : भाजपचे 'अच्छे दिन' फक्त टीव्हीवरच, लातूरला चांगले दिवस आमच्यामुळे; देशमुखांनी डागली तोफ

दरम्यान आज पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी योगेश्वरानंद यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी प्रयत्न केले. यासंदर्भात त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे पिठादेशवर आणि श्री निरांजनी पंचायती आखाड्याचे सोमेश्वरानंद सरस्वती यांची भेट घेतली. नाशिकच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये यासाठी पाठिंबा देण्याची विनंती पालकमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी प्रशांत जाधव, रंजन ठाकरे, सुदाम कोंबडे, अंकुश पवार असे महायुतीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Nashik Lok Sabha News
Varun Sardesai News : '...तर आता वडील मुख्यमंत्री असताना तुम्ही खासदारकी का लढवता?' ; वरुण सरदेसाईंचा श्रीकांत शिंदेंना सवाल!

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आणखी दोन दिवस आहे. त्यामुळे या कालावधीत महायुतीच्या बंडखोरांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संबंधितांची संपर्क केला आहे. निवडणुकीचे (ELection) वातावरण तापू लागल्याने अडचणीच्या उमेदवारांची निवडणुकीतून माघार व्हावी यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com