Nashik Lok Sabha : अपक्षांची 'तुतारी' राष्ट्रवादीसाठी अडचणीची !

The symbol Tutari is at number 174 in the Election Commissions list : निवडणूक आयोगाच्या यादीत 174 क्रमांकावर तुतारी हे चिन्ह असून, त्याचे मराठी भाषांतर हे तुतारी करण्यात आले आहे..
election commission ncp sharad pawar faction
election commission ncp sharad pawar factionsarkarnama

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट ‘तुतारी फुंकणारा मनुष्य’ या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत लढवत असताना ‘तुतारी’ हे नामसाधर्म्य असलेले चिन्ह अपक्षांना मिळणार असल्याने त्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. शरद पवार गटाने याबाबत आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळून लावल्याने अपक्षांची ‘तुतारी’ राष्ट्रवादीला अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे गेले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा मनुष्य हे निवडणूक चिन्ह मिळाले असून, त्यावर लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे.

नाशिक (NASHIK) जिल्ह्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा उमेदवार असल्यामुळे त्यांना या चिन्हाचा वापर करावा लागणार आहे. परंतु, निवडणूक आयोगाने अकरा प्रमुख राजकीय पक्षांसाठी चिन्ह निश्‍चित करून दिले आहे. सोबतच अपक्ष उमेदवारांसाठी 190 वेगवेगळे चिन्ह जिल्हा निवडणूक विभागाला दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

election commission ncp sharad pawar faction
Lok Sabha Election 2024 : धुळ्यात काँग्रेसला मोठा दिलासा, एकाच दिवशी दोन गुड न्यूज!

अपक्ष उमेदवारांनी मागणी केल्यानंतर त्यातून एक चिन्ह देण्यात येते. निवडणूक आयोगाच्या यादीत 174 क्रमांकावर तुतारी हे चिन्ह आहे. त्याचे मराठी भाषांतर हे तुतारी करण्यात आले आहे. प्रत्यक्षात दोन्ही चिन्हांमध्ये कुठेही साधर्म्य दिसून येत नाही. पण ‘तुतारी’ या एका शब्दावरच राष्ट्रवादीने (NCP) आक्षेप घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही यासंदर्भात वाद निर्माण होऊ शकतो. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभाग सतर्क झाला असून, मराठीसह ‘हिंदी’तील शब्दही कसा वापरता येईल, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

चिन्ह वाटपाच्या वेळी उमेदवाराकडून तुतारी चिन्हाची मागणी झाल्यास याविषयी विचार करण्यात येईल. ही चिन्ह एकसारखी नसून मराठी नावे सारखी आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करत निर्णय घेतला जात असल्याचे निवडणूक विभागातील उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी स्पष्ट केले.

(Edited by : Chaitanya Machale)

R

election commission ncp sharad pawar faction
Rajabhau waje News : नाशिकबाबत राजाभाऊ वाजेंनी मांडलं 'व्हिजन', बाहेरील उमेदवार म्हणणाऱ्यांना दिलं प्रत्युत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com