Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटे यांना ती चूक पडली महागात? अटक वॉरंट निघताच मंत्रीपदही धोक्यात?

Nashik Manikrao Kokate House Government Fraud Court issues arrest warrant against Sports Minister Manikrao Kokate Punishment Court Arrest Warrant-नाशिकच्या राजकारणात भुकंप, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात न्यायालयाचा अटक वॉरंट निघाल्याने खळबळ
Manikrao-Kokate-Ajit-Pawar
Manikrao-Kokate-Ajit-PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik court news: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामध्ये त्यांनी केलेली एक चूक त्यांना महागात पडली.

नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. बदर यांनी मंगळवारी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवली. कनिष्ठ स्तर न्यायालयाने २० फेब्रुवारीला क्रीडा मंत्री कोकाटे यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात क्रीडामंत्री कोकाटे यांनी अपील केले होते.

क्रीडामंत्री कोकाटे यांना काल न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यांचे वकील अॅड अविनाश भिडे उपस्थित होते. मात्र स्वतः मंत्री कोकाटे अनुपस्थित होते. क्रीडा मंत्री कोकाटे अनुपस्थित राहिल्याने ते आता अडचणीत आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षालाही हा धक्का मानला जातो.

Manikrao-Kokate-Ajit-Pawar
Ajit Pawar Politics: `भुजबळ फार्म` राष्ट्रवादीचे केंद्र; इच्छुकांच्या मुलाखती आधीच रंगल मानापमान नाट्य! निवडणुकीवेळी कसं व्हायचं?

जिल्हास्तर न्यायाधीश पी एस बदर यांनी यासंदर्भात कनिष्ठ स्तर न्यायाधीश नरवाडिया यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार काही वेळापूर्वी न्यायालयाने कोकाटे यांना अटक करण्याचे वॉरंट जारी केले. सरकार वाडा पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे.

Manikrao-Kokate-Ajit-Pawar
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन '100+' वर ठाम, शिंदे शिवसेना पक्षाच्या अफाट अपेक्षा ठरताहेत महायुतीला अडसर?

दरम्यान क्रीडामंत्री कोकाटे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्यात आले आहे. या अपिलाची सुनावणी अद्याप झालेली नाही. ती केव्हा होईल हे देखील अनिश्चित आहे. त्यामुळे क्रीडा मंत्री कोकाटे यांना कायदेशीर उपाय योजना कराव्या लागणार आहेत.

क्रीडा मंत्री कोकाटे आज दुपारी न्यायालयात हजर राहून पुढील कार्यवाही पूर्ण करणार होते. न्यायालयात हजर राहून अटक वॉरंट रद्द करणे आवश्यक आहे. त्यानंतर न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर केला जाईल.

दरम्यान कोकाटे न्यायालयात हजर न राहिल्याने ती चूक त्यांना कायदेशीर दृष्ट्या अडचणीत आणणारी ठरली आहे. त्यांना शिक्षा झाली आणि अटक वॉरंट निघाले त्यामुळे त्यांचे मंत्रीपद धोक्यात येऊ शकते. संदर्भात आज मंत्रिमंडळाची बैठक असल्याने कोकाटे हे देखील मुंबईतच होते. ते नाशिकला येऊ शकलेले नाही.

न्यायालयाने अटक वॉरंट काढल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या मंत्र्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट काढला आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या तो चर्चेचा विषय ठरला आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com