Ajit Pawar Politics: `भुजबळ फार्म` राष्ट्रवादीचे केंद्र; इच्छुकांच्या मुलाखती आधीच रंगल मानापमान नाट्य! निवडणुकीवेळी कसं व्हायचं?

NCP candidate selection process: मनपा निवडणुकीसाठी नेमलेल्या समितीलाच 'त्या' नेत्यांनी ठेवले अंधारात?
Ajit Pawar election strategy
Ajit Pawar election strategySarkarnama
Published on
Updated on

Nationalist Congress Party Internal Politics: महापालिका निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. त्यामुळे अपरिहार्य म्हणून हा पक्ष सक्रिय झाला आहे. मात्र इच्छुकांच्या मुलाखतीआधीच नवा वाद उभा राहिला आहे.

राज्यातील सत्ताधारी महायुतीने एकत्रित निवडणुका लढविण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली. प्रत्यक्षात ही युती होईल का? याबाबत साशंकता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेबाबत सूचक विधान केले. या ठिकाणी भाजप स्वबळावर निवडणुकीची तयारी करीत आहे. या संकेतांमुळे आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार बचावात्मक झाले आहेत.

Ajit Pawar election strategy
Girish Mahajan : नाशिकचे चार मंत्री तपोवनातील कुऱ्हाडीपासून चार हात लांब, सगळे घाव गिरीश महाजनांच्याच उरावर

नाशिकमध्ये या पक्षाचे पदाधिकारी किती सक्रिय यावरून कार्यकर्त्यांतच मतभेद होते. महापालिका निवडणुकीसाठी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुकाणू समिती जाहीर केली. मात्र या समितीला आणि प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयालाच आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची कुजबुज आहे.

Ajit Pawar election strategy
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं दुसरं मंत्रिपदही धोक्यात, सदनिका प्रकरणात सत्र न्यायालयाचा धक्कादायक निर्णय

आज पासून पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत. या मुलाखती भुजबळ फार्म येथे होणार आहेत. त्याबाबत पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने समाज माध्यमांवर सूचना केली. मात्र पक्षाचे स्वतंत्र कार्यालय असताना मुलाखती भुजबळ फार्म येथे होत आहेत.

मुलाखतीच्या ठिकाणी आणि त्याबाबत सुकाणू समितीलाच अंधारात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सुकाणू समितीच्या सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 'भुजबळ फार्म' राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे केंद्र होणार आहे. त्यामुळे सर्व निर्णय आणि अधिकारही येथेच एक वाटतील.

मुलाखतींच्या ठिकाण आणि याबाबत सुकाणू समितीच्या सदस्यांनाच माहिती नाही. शहराध्यक्ष मात्र याबाबत काय भूमिका घ्यावी या धर्मसंकटात सापडले आहेत. त्यांना मुलाखतींना हजर राहणे अपरिहार्य बनले आहे.

सुकाणू समितीतील अन्य नेत्यांत मात्र मुलाखतींचे ठिकाण आणि प्रक्रिया याबाबत अंधारात ठेवल्याची भावना. त्यामुळे निवडणुकीआधीच या पक्षातील एकोपा किती? याची चर्चा सुरू झाली आहे. या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com