Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाबाबत खासदार भगरेंचा सरकारला इशारा; अन्यथा नाशिककर आंदोलक मुंबई गाठणार!

Nashik Maratha reservation movement Manoj Jarange Patil supports warning to government-नाशिक जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंब्यासाठी आंदोलनाची धग वाढली, रोज होतोय रस्ता रोको
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilManoj Jarange Patil
Published on
Updated on

Maratha Reservation News: मनोज जरांगे पाटील मंगळवारी मुंबईला रवाना झाले. आंदोलकांनी मुंबईला येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र नाशिककर आंदोलकांनी राज्य सरकारला थेट मुंबईला येऊन आंदोलन करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. 

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी जिल्ह्याच्या विविध भागात रोज रास्ता रोको आंदोलन होत आहे. विविध तालुक्यांमध्ये शासनाला निवेदन देण्यात आले आहे. आंदोलनाची ही धग आता वाढू लागली आहे. 

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे. ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण मिळावे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्य शासनाने तातडीने सकारात्मक संवाद साधावा, या प्रमुख मागण्यांवर आंदोलक ठाम आहेत. 

Manoj Jarange Patil
Maratha Politics : नाशिकमध्ये मराठा आंदोलनाची धग! आंदोलक आक्रमक; रस्ता रोखला, जोरदार घोषणाबाजी!

दिंडोरी महामार्गावर या मागण्यांसाठी मंगळवारी शेकडो कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला. या रास्ता रोको मुळे तासभर वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. आंदोलकांशी संवाद साधल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आला. 

Manoj Jarange Patil
Maratha Politics : नाशिकमध्ये मराठा आंदोलनाची धग! आंदोलक आक्रमक; रस्ता रोखला, जोरदार घोषणाबाजी!

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी गेल्या आठवड्याभरात रोज विविध भागात आंदोलन आणि रास्ता रोको होत आहे. आंदोलनाची तीव्रता आता वाढू लागली आहे. आंदोलकांनी राज्य शासनाच्या विविध मंत्र्यांच्या नकारात्मक विधानांवर तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. 

जरांगे पाटील यांनी आंदोलकांनी मुंबईला येऊ नये, असे आवाहन केले आहे. मात्र नाशिकचे आंदोलक या प्रश्नावर आक्रमक आहेत. येत्या एक-दोन दिवसात शासनाने जरंगे पाटील यांच्याशी संवाद साधून मार्ग काढावा. अन्यथा आंदोलन मुंबईला धडकतील असा इशारा यावेळी देण्यात आला. 

लासलगाव येथे झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांच्या बैठकीत शासनाला इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भगरे यांनीही सरकारला इशारा दिला आहे. आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार गंभीर कारवाई करीत नाही. त्यामुळे तातडीने संवाद साधावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल असा इशारा खासदार भास्करराव भगरे यांनी दिला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com